नमस्कार,
रंगकर्मी संस्थळावर आपले स्वागत.रंगकर्मी हे नाट्यकर्मींसाठी आणि नाट्यरसिकांसाठी व्यक्त होण्याचे ठिकाण आहे.मराठी सांस्कृतीक जीवनाचा नाटक हा अविभाज्य घटक आहे.मात्र नाटकावर बोलण्यासाठी आपल्या मायमराठीत एकही संस्थळ नव्हते,ती कसर भरुन काढण्यासाठी ह्या स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कदाचित सध्याची माध्यमे नाटकावर व्यक्त होण्यास अपुरी पडत आहेत असे वाटल्याने सुद्धा या संस्थळाच्या निर्मितीला बळ आले.
या ठिकाणी नाटकाविषयी आस्था असणारा कोणीही माणुस लिखाण करु शकतो. यासाठी नाट्यानुभव, स्क्रीप्टींग,परीक्षण असे अनेक विभाग करण्यात आलेले आहेत्.याशिवाय सध्या नाट्यजगतात काय चालु आहे याचीही खबर लोकाना रहावी यासाठी महाराष्ट्रात ची सोय करण्यात आलेली आहे.याशिवाय थेट भेट मधुन आपण विविध संस्थांची आणि नाट्यकर्मींची माहिती देऊच.याशिवाय विविध विषयांवर गप्पा मारायची सोयही केलेली आहे.
थोडक्यात सांगायचे तर विविध सोयींचा अंतर्भाव करुन एक सर्वांगीण संस्थळ बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.या संस्थळाचे लेखक आणि संपादक मंडळही तितकेच तोडीचे आहे हे सांगणे न लगे.मात्र तुमच्या सहभागाशिवाय हे सर्व अपुर्ण आहे,म्हणूनच तुमच्या सहभागासाठी एक विशेष विभाग उपलब्ध केलेला आहे,खरेतर तुमचा सहभाग हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.तुम्ही आम्हाला भरभरुन प्रतिसाद द्याल याची खात्री आहेच.
या संस्थळावर लोकांनी व्यक्त होणे महत्त्वाचे आहे.यासाठी तुम्ही आपले अभिप्राय्,मते आवश्यक बदल आणि नाटकासंबंधी असलेले कोणतेही लिखाण आम्हाला marathinatak@gmail.com वर जरुर पाठवा आम्ही ते नक्की प्रकाशित करु.
या सर्व गोष्टींनतर रंगकर्मी.कॉम सुरळीत चालेल अशी अपेक्षा आहे, मात्र आम्ही काही नियम बनवत् आहोत ज्यायोगे भविष्यात काहीही अडचण होणार नाही.
हे नियम पुढीलप्रमाणे आहेत.
१. या संस्थळावरील कोणत्याही लेखांचा हक्क हे संस्थळ राखुन ठेवत नाही, तो हक्क त्या लेखकाकडे आहे.मात्र या संस्थलावरुन त्या लेखाचे पुनर्मुद्रण वा इतरत्र प्रकाशित करावयाचे असल्यास त्यास लेखकाची परवानगी आवश्यक आहे. यासाठी तुम्ही marathinatak@in.com वर संपर्क साधावा हि विनंती.
२.या संस्थळाचा उद्देश नाट्यचळवळ वाढणे हाच असल्याने यावरील काही निवडक लेख लेखकाच्या संमतीने मिसळ्पाव, मायबोली यासारख्या संस्थळांवर प्रकाशित केले जातील.
३. या संस्थळावर प्रकाशित एकांकिका आणि नाटकांचे प्रयोग करावयाचे असल्यास त्या लेखकाची पुर्व परवानगी आवश्यक आहे, यासाठी संबंधित व्यक्तींनी वरील ई मेल वर संपर्क साधावा.
४. या संस्थळावर वाचकांचे जास्तीत जास्त लेख प्रकाशित केले जातील ,मात्र प्रकाशित करण्यास विलंब होऊ शकतो याशिवाय कोणताही लेख वा प्रतिसाद नाकारण्याचा संपुर्ण अधिकार रंगकर्मी प्रशासन राखुन ठेवत आहे.
५. रंगकर्मी हे व्यावसायिक पातळीवर नाही.त्यामुळे यावर सांगीतली जाणारी माहिती वा नाटकाविषयी अपडेट देताना कोणताही पैशाचा व्यवहार केला जात नाही.
६. आपणाला या संस्थळास मदत करावयाची असल्यास वा अधिकृत जाहिरात द्यायची असल्यास सध्या ती सोय उपलब्ध नाही मात्र लवकरच ती सोय द्यायचा प्रयत्न केला जात आहे. तोपर्यंत आपण आम्हाला वरील पत्त्यावर संपर्क साधु शकता
७. ह्या संस्थळावरील सर्व विचार हे लेखकाचे आहेत व त्याच्याशी प्रशासन सहमत आसेलच असे नाही.

महाराष्ट्रातील एकुणच जगभरातील नाट्यचळवळ वाढीला लागावी ,त्या प्रसारासाठी इंटरनेट माध्यम बनावे यासाठी हा खटाटोप,बाकी तुम्ही सांभाळुन घ्यालच.ईश्वर आणि रंगदेवता हा प्रयोग यशस्वी करो हीच प्रार्थना
आपले नम्र,रंगकर्मी प्रशासन
0 comments:
Post a Comment