समीरा : रिडीक्यूलस ..... तुझ्यात ना उरमटपणा भरलाय ठसठसून.
ती : असेल. तो प्रत्येक माणसात असतो.
समीरा : म्हणजे माझ्यात उरमटपणा आहे असं म्हणायचय. You ss.
ती : Dear जानू... चूकीची स्टेटमेंट करतीयस. मी आक्रमकता म्हणाले & जानू चिडू नकोस.... तू जोपर्यंत तुझं नाव सांगत नाहीस तोपर्यंत मी जानूच म्हणणार.
समीरा : नाही सांगणार. काय कंम्पलशन आहे.
ती : ठसठसून
समीरा : तुझ्या तोंडात लसूण (ती हसते.... समीरा ही हसण्याचा प्रयत्न करते)
ती : कविता लिहतेस का गं?
समीरा : हं. शाळेत असताना करायचे कविता....
ती : तशा नाही गं. शाळेत असताना कोणीही कविता करत.
समीरा : तू काय मी किती प्रगल्भ आहे याची परीक्षाच घेतेस जणू
ती : चला दोघी मिळून गाणी म्हणू.... बघ झाली ना कविता.... (समीरा पण किंचित हसते) So आज Saturday ला काय प्रोग्राम आहे.
समीरा : Nothing special वही पुराना घिसा पिटा प्लान. मूव्ही पॉपकार्न, गोलगप्पा & Night का pub, dance & vodaka!
ती : Oh! oh vodaka । ः..
समीरा : Only vodaka!
ती : तू इंटर द ड्रॅगन पाहिलायस?
समीरा : शी! बुवा आता त्याचा इथं काय संबंध (ती आणखी प्रश्न विचारु का उत्तर देतेस. अशा खुणा करते) नको तू आणखी काही विचारु नकोस. पाहिलाय मी सिनेमा.
ती : किती वेळा?
समीरा : 2 - 2 वेळा
ती : मग आणखी एकदा पहा
समीरा : Why?
ती : जरा तुझ्या मेंदूला त्रास देऊन चित्रपट आठव इथं तुझ्या स्मरणशक्तीला वाव आहे.
समीरा : तूला कसं माहिती की हल्ली माझ्या काही लक्षात राहत नाही ते. हल्ली सर्व गोष्टी रिमांडरमधे save करायली लागलीय.
ती : बोलू
समीरा : Ya! please
ती : thank you.. तर एका प्रसंगात एक तरुण फायटर मॅच खेळत असतो आणि इकडे आपला ब्रुसली.
समीरा : आपला?
ती : माझा ..... ऐक तर खरं, तर ब्रुसली त्या तरुणाचं निरीक्षण करत असतो. त्याचा खेळ पाहून तो इतकच म्हणतो की अंगात नुसता जोश असून चालत नाही तर त्यात इमोशन भर, त्या कामात भावना ओत. या लाईफ मध्ये स्ट्रगल करताना कधी हरणार नाहीस.
समीरा : पण भावनेच्या आहारी जाऊन माणसं फसताना पाहिलीयत मी
ती : यारा! मी केवळ भावना अस म्हणालो नाही. जिद्द चिकाटी परिश्रम याबरोबर भावनेची सांगड घालावी.
समीरा : याने. मैने जिंदगी में..... कोई भी काम (सुस्कारा) म्हणजे तुला अस म्हणायचं आहे मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक कृती भावनाशिवाय केली?
ती : Yup! (बराच वेळ शांतता..... समीरा पर्समधून सिगरेट काढते. ती समीराच्या हालचाली बघतीय.... सिगरेट पेटवत नाही. थांबून.)
समीरा : म्हणजे तू मेरे जिंदगी को Direction देगी. मग तू डेलीसोप करणार की साप्ताहिक.
ती : Hey तू तर एकदम टंपर निघालीस. अपूुरू ना साप्ताहिक ना डेलीसोप और समझले मैने किया भी तो यकीनन तू बोअर हो जाओगी. Then you सर्च ब्लडी प्रायोजक.
समीरा : प्रायोजक? Means?
ती : प्रायोजक Means ःः व्यसन. Tention व्यसनाला जन्म देते असं कोणी तरी म्हटलय ना!
समीरा : कोणी म्हटलयं?
ती : असं म्हणायची पध्दत असते. आणि तुला असं वाटत नाही का जानू आपलं विषयांतर होतय.
समीरा : पण तुझाच होता ना सॅटरडे नाईट मधे .... हं.
ती : माझा? No wayः.. सर्वांचीच चर्चा चालली होती ना आणि तू सुध्दा full too तयारी निशी आहेस ना?
समीरा : जे जे आयुष्यात येतं ते enjoy करावं अस वाटत ना कधीकधी. उद्या कोणी बघितलय?
ती : क्षणात मोठया बाईसारखी बोलायला लागलीस. जिचं सर्व काही जगून झालय.
समीरा : मृत्यूला काय घाबरायचं. नीट जगता येत नसेल तर मरायला काय हरकत आहे?
ती : धर्ेी ाशरप आत्महत्या!
समीरा : कित्येकदा वाटलं देखिल. पण नाही आलमरण
ती : जीव जायचा तेव्हाच जाणार. तो काय भिखारी आहे. इतने सालों की भीख डाल दी उसकी झोली में और कहा, जाओ. उसमे अपनी मर्जी थोडीही होती है!
समीरा : I don’t know आपण इतक कसं बोलतोय.....
ती : बोलतोय हे कमी आहे का?
समीरा : मी बोलू.....
ती : बोल ....
समीरा : मला ना कधी कधी वाटतं की आपलं जगून झालयं...., ज्याच्यावर मनापासून प्रेम करावं अस माणूस आपल्याला भेटल. हेच खूप! जर त्याने ते स्विकारले असते तर
ती : जह! तो ऐसा झमेला है फिर ....Breakup…. येडचाप, तुला जर स्वत: त्याच स्वत:ची मदत करावी असं वाटत नाहीय इतरांनी आपल्या विषयी प्रेम बाळगावे. सोबत करावी अशी कशाला अपेक्षा करतीस? आणि तुझं वय आहे काय मरणाबिरणाचं बोलायचं? इतकी काम दिसतायत. बरच काही करायचं आहे तुला आयुष्यात, पळ कशाला काढतेस?
समीरा : I know जगात राहणं काहीतरी करुन दाखवणं हे चांगलच आहे. but I फिल मरण ही फार सुंदर गोष्ट आहे. वेदनेच टोक इतक सुंदर असंतकी त्यावरुन सुटणं... हा अनुभव सुंदर so I like deth.
बबबघाबरुन जावं अस काही असेल तर ते आयुष्यात, मरणार नाही. मृत्यूला काय घाबरायचं? तो तर सगळया भयांचा अंत. fear means Darkness & Death means light. मृत्यू नसता तर जन्मायला जागाच नसती! मला वाटत आयुष्यात विश्वसनीय काय असेल तर ते म्हणजे मृत्यू .... साला....कसे जगू सांगता येणार नाही, पण मरणार हे माहिती असतं.
ती : ये भग्गू. अजून तुला बरच काही करायचं आहे लहान आहेस. हे सगळं ती मोठमोठाली पुस्तक वाचून होतयं. भेंडी.... तुम्ही लोक ना प्रेशर खायला सुध्दा दुसऱ्यांची दु:ख वाचत बसता कसं साफ होणार पोट.
मुझे लगता है हमे अपनेबारेमे बात करनी चाहीए। अगदी थेट, दुसऱ्यांची expression होऊन अपने सवाल नही छुटते.... नाहीतर मग हे असं होतं. प्रेशर आणायला पुस्तक .... (हसायला लागते .... समीरसुध्दा थोडीच हसते.) काय आहे. स्पॉन्सर्ड हास्य वाटत असले तरी मी नेहमीच हसत असते.
समीरा : स्पॉन्सर हास्य म्हणजे?
ती : सगळे हसतात म्हणून आपणही हसायचं, त्याला स्पॉन्सर हास्य म्हणायचं.
समीरा : You mean माझ्या हसण्यात कृत्रिमता आहे?
ती : वा!
समीरा : कशाबद्दल वा!
ती : तुला कळतय का येडचाप मगापासून तू मला कितीतरी प्रश्ने विचारतेस आणि मी उत्तर देतीय good keep it up.
समीरा : (सिगरेट काढते..... खेळते) मगाशी तू Direction बद्दल काहीतरी बोलत होतीस. Direction म्हणजे नेमक काय करणार तू
ती : म्हणजे तुला सत्य जाणून घ्यायचय तर!
समीरा : अर्थात!
ती : तुझे पता हम लोग ना. प्रत्येक गोष्टीची कुठल्या कुठल्या गटात विभागणी करतोच. मग ती स्त्री-पुरुष असो, हुशार - ढ असो, देव मानणारे अथवा न मानणारे गमत म्हणून सांगते नीट ऐक या सगळया विभागणीत एक गट कायम वेगळा असतो आणि समजतो सुध्दा. बिच्चारे! शोध लावण्याशिवाय पर्यायच नसतो या शास्त्रज्ञांना....
समीरा : गंमत काय आहे....
ती : समाजाने ठरवून दिलय की शास्त्रज्ञ म्हणजे अमक्या तमक्या गोष्टीवर विश्वास नसतो, आणि जरी तरी तो ठामपणे दाखवू शकत नाही. खरं म्हणजे त्यांचा कुठल्या गोष्टीवर विश्वास असतो. हेच मुळी आपण पाहत नाही. सत्य शोधण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्या कृतीवर, विचारावर आपला स्वत:चा विश्वास पाहिजे. आणि तो ठामपणे इतरांना पटवून देता आला पाहिजे.
समीरा : याने इतनी क्वालिटी अगर हममें होतो हम scientist बन सकते है।
ती : (हसते) तू फार हसत जरी नसलीस तरी झग मारण्यात पटाईत आहेस जानू.
समीरा : Hey. Wait bady….. मी माझी ओळख करुन देते.... I am समीरा CFX कंपनीत एझ्क्यूटीव्ह आहे. चांगला स्वभाव चांगली नोकरी चांगल घर आईवडील बहीण भावंड सगळ काही चांगलं.....
ती : आणि चांगला नवरा .... (ती रागाने बघते) जह. Sorry… विसरलेच मी..... लगेच अपसेट कसली होतीस take it easy your.. चल toast for this.. काहीतरी पिऊया.....vodaka!
समीरा : नको..... vodaka प्यावी पण मजा येईपर्यंत... रडायला अनेक कारण आहेत. त्यासाठी पैसे खर्च करुन दारु प्यायची. पिऊन रडून नाही आलं पाहिजे.
ती : good…. यू आर राईट मजा कर बाई मजा कर.... बाकी काय, कमी अधिक फरकानं सेमच असतं, टिकली पुरता नवरा समूबाई. दाखवू नको तुझा तोरा. तुझा बिछाना माझ्यावानी कोरा. स्ट्रोल घेऊन उगाच फिरा नाच रे मीरा!
(दोघी हसतात.... त्यांच्या समोरुन एक माणूस जातो. दोघीही स्तब्ध... तो बघून निघून जातो.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा.
क्रमश:
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा.
0 comments:
Post a Comment