Showing posts with label स्क्रीप्टींग. Show all posts
Showing posts with label स्क्रीप्टींग. Show all posts

फ्लश आउट -अंतिम


(प्रकाश येतो तेव्हा दोघी प्रेक्षकांना पाठकरुन उभ्या/बसलेल्या आहेत.)
                  मागे लहानपणीची समीरा झोपाळयावर आहे.
समीरा       : लहानपणी मला झोके घ्यायला खूप आवडायचं.... बाबाची आणि माझी चांगली गट्टी होती.  तस आईवर ही माझं सारखंच प्रेम होत पण बाबा माझा खास होता.  आईला उंच झोके घेतलेले आवडायचे नाहीत.  मग मी नुसतीच झोपाळयावर बसून गोल फिरत पायानं जमीन खुरडत बसायचे.... त्यावेळी मी 14-15 वर्षाची होते.  आईच्या त्या हटकण्यामागे खरं कारण काय ते मोठं झाल्यावर कळलं.... तर तिथं आमच्या घराशेजारी श्वेतल राहायचा.... गोरा पान.... गोबऱ्या गोबऱ्या गालांचा.... तो यायचा माझ्या सोबत खेळायला आणि येताना एक भिरभिरं घेऊन यायचा.  आईची नजर चुकवून मी आणि श्वेतल उंच उंच झोके घ्यायचो आणि भिरभिऱ्याच्या फटफट आवाजाप्रमाणे हसायचो.
ती              : अच्छा याने बचपन का प्यार.... कहानी पुरी फिल्मी है यार ....
समीरा       : तसचं काहीसं...., लहानपणी आईला बोलता बोलता सांगून टाकलं.... की मी मोठी झाले ना की मी श्वेतलशीच लग्न करणार.  मग काय तेव्हा पासून श्वेतलची भेट बंद मग मी एकटीच जमीन खुरडत बसायची.....then काहनी ने फिर एकबार मोड लिया... अगदी फिल्मी स्टाईलने दोघांची भेट झाली.  एक पबमधे नेहमीप्रमाणे शनिवारची रात्र मी आणि सर्व कलिग्स.... सार्वजनिक शपक्षेू करायला.... तिथं एका तरुणाची नजर माझ्यावर खिळली.  त्याने नजर चोरली पण मी त्याला ओळखला गोबऱ्या गोबऱ्या गालांवर खळी पडणार तोच होता माझा श्वेतल. मी त्याला अडवलं.  त्याच्यासमोर उभी राहिले रुक्मिणीसारखी.... आणि हात पुढे केला आणि म्हणाले माझं भिरंभिरं... तो किंचित हसला..., बराच वेळ मी बोलत होते.  प्रेम आणि त्याचा अर्थ याची जाणीव होत होती.  लहानपणीची सुप्त इच्छा आता पूर्ण होईल असं वाटत होतं.  ज्याला आपल सर्वस्व वाहून घ्याचं असच वाटत होतं.  पबमधील गर्दीने घामाघूम झालो होतो दोघही पण तो काहीच बोलत नव्हता, वाटलं त्याचे गोबरे गाल ओढावे आणि किस करावं.... तो खूप अस्वस्थ वाटत होता.  मग मीच धीर करुन त्याला विचारलं.  सध्या काम काय करतोस? पण एवढया वेळाच्या शांततेनंतर त्याच्या उत्तराने मीच कोसळले.  तो म्हणाला....
श्वेतल         : मी शरीर विकतो....
समीरा       : त्याचं ते एका वाक्यातील उत्तर ऐकून मी माझीच उरले नाही.  एकाक्षणी वाटल की पर्समधील असतील नसतील तेवढे पैसे द्यावेत आणि आपल प्रेम विकत घ्यावं आणि त्याला सोपवून द्याव.... पण नाही.  माझ्या नजरेन त्याला प्रश्न आणि त्याच्या नजरेन उत्तर आधीच देऊन टाकलं.  मग मी घरी आले.... दोन दिवसांनी एक पार्सल आलं.  त्यात श्वेतलन पाठवलेल भिरभिरं होतं.  ते आजही बाल्कणीत फटफट आवाज करत उभ आहे....
ती              : डे अजून काही बाकी आहे की बास! .... गडबडीत काय मागितलस कळलना!
समीरा       : अग येडचाप.... पण मग तुला विचार करुन द्यायला काय झालं होतं.  कितीही झालं तरी पर्सनल होत ते... (शांतता)
ती              : पण तूच गोंधळ केलास ना भेंडी..., give me  give me….
समीरा       : ये वांगी...
ती              : भेंडीत जी मजा आहे ती वांग्यात नाही... (हसतात) रपूुरू एका अर्थी बरच झालं तुझ्या त्या भावना किती मर्यादित आणि स्वच्छ आहेत....I like it you … great!
                  (तेवढयात तो माणूस पुन्हा समोरुन जातो.)
समीरा       : मला एक कळत नाहीय हा माणूस आपली शांतता का भंग करतोय...
ती              : डबा खाऊन झाल्यावर झोपायची जागा असणार त्याची बहुतेक...! चल मी निघते.
समीरा       : बस गं जाशील कंटाळून...., तुझ्याशी बोलताना बरं वाटतय.... मला एक कळत नाही Sex is need I agree nU everyone behave as like it is compaltion why? What is the truth.
ती              : सत्य!..... (आजूबाजूला पाहते बाकावरील पेपर वाचते.) सत्य शोधणाऱ्यांचा शेवट येशू सॉक्रॅटिस आणि महात्मांजीसारखा होतो.
समीरा       : काय?
ती              : ए ऽऽ बाई हे मी नाही.  पेपरातलं वाचून सांगितलं.... (दोघीही खूप हसतात) Dear समीरा जानू मी तुला काय सांगू अपून की एक सिंपल फिलॉसॉफी है।
समीरा       : मी सांगतेना तुझं काय म्हणणं असेल
ती              : अच्छा Ok!
समीरा       : तू म्हणशील.... जीवनात येणारा प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने तोंड दे.
ती              : राईट
समीरा       : तू म्हणशील परिस्थितीला सामोरे जा.
ती              : धशी!
समीरा       : तू म्हणशील जीवनाचा प्रत्येक क्षण आणि क्षण आनंदाने जग.  सतत past future ची काळजी करत बसू नको. live in present behappy
ती              : Hey शाब्बास!
समीरा       : मी सर्वांना सांगेन हरिूः0श्निआय एम केव्हापासूनच्या घालमेलीतून मला आता मोकळं झाल्यासारखं वाटतय....श्वेतलची स्थिती पाहून तिथे माझ्याकडे ठामपणा नव्हता.  पण अशा ठिकाणच्या ठामपणाची तरी काय गरज.
ती              : पण जाणीव तर झाली ना.
समीरा       : thanx… दोघांनाही thanx जिनं मला जन्म दिला आणि ज्यानं माझ्या ठामपणाला जन्म दिला.... Dear तुला सांगू मला माझं नव आयुष्य अगदी नीट दिसतय...., मी आक्रमक नाहीय, सर्वांची लाडकी झालीय..., माझ्या घरातून बाहेर पडून वळलंकी शेजारचा टायर पंक्चरवाला तेथून पुढे आले की चायवाला (बस मधला कंडक्टर) दररोज भेटणाऱ्या प्रमिला ताई.  ऑफिस खालचा पानवाला शेजारचे रिक्षावाले.  आमचा वॉचमन.  आमची रिसेप्टनीश मुग्धा पानसे.... लिप्टमन.... माझा कलीग तन्वीर, मला पाणी आणून देणारा शिपाई आणि साहेबांनी बोलवलय म्हणून निरोप देणारा आमचा अकांटंट.  आणि मी ही बॉडी स्प्रे मारुन शेजारच्या दिपककडे स्माईल देऊन ठामपणे may I come in sir अस म्हणून आत जाणाऱ्या आम्ही समीरा.... 15 दिवस सुट्टीचे आणि प्रमोशनचे लेटर घेऊन येणारी  we are sameera!.... finally I decided to flushout  blady all crap things. or (finally I came to the counclusion that all crap things can be flushout.
                              (अंधार ... तेवढयात मोबाईल वाजू लागतो जो समीराने बाथरुमच्या आरश्यासमोर ठेवला आहे.  त्यावर गाणं आहे किसी की मुस्कराहटे हो... निसार... दरवाजा वाजतो, फ्लशचा आवाज.  समीरा  बाथरुमजवळ आहे.  मागे झोपाळयावर ती उंच झोके घेतीय.  समीरा दरवाजा उघडते.  तन्वीर म्हणजे जो सारखा मधेमधे येणारा माणूस स्वच्छ कपडयात येतो.  ती जाते.)
तन्वीर        : अग कितीवेळ झाला मी दार वाजवतोय... आख्खं बुक वाचून काढलसं की काय?
                  (तन्वीर दरवाजा बंद करतो.  मागे झोपाळा रिकामा झुलतोय आणि बेंच वर तो बसलाय....)  समीराचा मोबाईल वाजतो.  किसी की .... स्टेजवर तीन इमेज दिसतात.  मागे झोपाळा.  शेजारी बाकावर तो आणि दरवाजा उघडण्याची खटपट करणार तन्वीर.... म्युझिक.  वाढत जाते.... तो फोन लावण्याचा प्रयत्न करतो.  शीट् .... (पडदा सरकतो)
तन्वीर        : तुम्ही इथ केव्हा पासून बसलाय...
तो              : जेव्हापासून तुम्ही लोकांना शिव्या देताय...

-- पडदा --
---------------------------------------------------------------------------------
अंतिम 
लेखक -विकास पाटील
-----------------------------------------------------------------------------------

 ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा.


फ्लश आउट- भाग ३

समीरा : हा माणूस असा का बघत गेला...
ती : आवडली असशील.
समीरा : शी!
ती : शी काय? तुझ्यावर कोणी प्रेम करावं असं वाटत नाही तुला?
समीरा : कोणी म्हणजे कोणही नव्हे.
ती : मग?
समीरा : जाऊ दे ना, नको त्या गोष्टीचा विचार... प्लीज डोंन्ट स्टार्ट अगेन...तुझी मशीन बंद कर. (सिगरेट काढते. खेळत बसते.)
ती : तुझं काय मगासपासून चाललंय ओढायची तर ओढ ना सिगरेट...
समीरा : माचिस नाहीय.
ती : आता काय बोलणार..
समीरा : कधी कधी वाटतं काहीच बदललेलं नाहीय आणि बदलणारही नाही....स्त्री नं पारंपरिकच राहिलं पाहिजे. तीनं माता. पतिव्रता हे सगळं असायचं लेकीन मॉडर्न रुपात...
ती : डिअर, धन्यवाद मान की अजून ब्रेक के पहले का ही एपिसोड चल रहा है।
समीरा : कौन से ब्रेक.
ती : वही घिसे पिटे पुराने...शाळा कॉलेज करुन मुलगी नोकरी करायला सुरुवात करते ना करते तोच लग्नाचा ब्रेक. तेव्हा नवरा आणि जॉब अशी कसरत करतोय तोच दुसरा ब्रेक मुलं होणं, मग 9 ते 5 दुसराच जॉब येतो मग स्वत:साठी काया करावं हेच ठरत नाही. ब्रेक के बाद नंतरच आयुष्य अनुत्तरीतच राहतं.
समीरा : तू म्हणजे त्या सिरियलवाल्या प्रमाणेच करतीयस सगळं कथानक काही का असेना सगळं काही चांगलं होतं. तसं करतीयस तू म्हणजे ज्या ज्या गोष्टी आयुष्यात प्रत्येकाला हव्या असतात. गरजा पूर्ण करण्या इतपत पैसा आणि वाढीव गरजाकरता लोन्स मिळतात. आणखी काय वेगळं डायरेक्शन देणार आहेस.
आता कंपनीची टारगेट्स पूर्ण करता करता स्वत:साठी काही उरत नाही. परदेशी फंडासाठी इच्छेविरुध्द बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याच...! पब्लिक रिलेशन. त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून जॉब केला. पण आता सर्व कामे फोन अथवा ई-मेल किंवा फॅक्सवर होतात. पूर्वी निदान नेटवर बसायला गेलं तर चार लोकांशी बोलणं तरी व्हायचं पण आता कंपनीनं लॅपटॉप दिलाय, with net connection कायम कुणाकुणाचं तरी अपेक्षांचं लोढणं गळयात बांधून फिरायचं, ते म्हशीला कसं गळयात साखळी घालून ओंडका बांधतात ना तसं कंपनीत गेले नाही तरी चालेल पण सतत 24 तास संपर्कात राहायचं नाटक सिनेमा डिस्कोसुध्दा कंपनीतल्या कलिग्जबरोबर enjoy करायचं, नशीब हनिमुनला तरी एकटे सोडतात....भें.....
ती : आयला... तू पण दे ना. हासड Bole तो बिंधास्त!
(समीरा तिच्या कानात शिवी देते दोघी हसतात. )
समीरा : पण शिव्या देऊन काय फरक पडतोय और वो भी बायकांवरुन दिली जाणारी खास पुरुषी शिवी आणि कोणावरुनही शिवी देऊ नये अगदी बिचाऱ्या प्राण्यांवरुनसुध्दा!
ती : पण मोकळं तरी होतो ना आपण. अशा बोंबलणाऱ्या बायका एकत्र जमल्या काहीना काही दबाव तयार होईलच ना.. तू नुसती अशी मोठ मोठाली पुस्तकं वाचा आणि शब्दांच्या पोकळ चर्चा करा. च्यायला.. सॉरी पुन्हा आईवरुन शिवी दिली. बाबा भावावरुन शिव्या आहेत का गं?
समीरा : कर मस्करी कर तू माझी. आहे एक ग्रंथ आहे मराठीत देईन तुला मग वाच.
ती : सॉरी, एकवेळ शिव्या देणं सोडेन पण पुस्तक वाचणार नाही..सॉरी..! जानू..
समीरा : मी माझं नाव सांगितलंय तुला.
ती : ओ.. अगेन सॉरी..समीरा....
(तो माणूस परत डोकावून जातो समीरा वैतागते...)
समीरा : अरे कोण आहे तू आणि काय हवंय तूला.
माणूस : मी..ही....ही..... नॉक नॉक मॅन..भू र्र र्र रर.....
समीरा : हा माणूस सतत का त्रास देतोय... ब्लडी..स्क्रांऊड्रल..
ती : अजूनही काही प्रमाणात आक्रमता टिकून आहे.
समीरा : शट अप. काय आक्रमकता लावलीय मगापासू.
ती : Hey just cool yaar.
समीरा : How can I cool हां just tel me, How can I cool सांग ना How can I cool आणि माझ्या आयुष्यातील गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होत नसतील याचाच अर्थ कोणी ना कोणीतरी करतच आहे ना अदृश्यपणे पण मग तू असं वेगळं काय करणार आहेस?
ती : दृष्टीकोन... जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन..
(समीरा वैतागते. सिगरेट काढते. ती पाहते. समीरा सिगरेट बाजूला ठेवते. पर्समधून एक चेंडू काढते. जमिनीवर आपटत राहते.)
ती : टेन्शन आलंय..., ख ाशरप अस्वस्थ झालीयस तू चल आपण एक गेम खेळू.
समीरा : गेम आणि इथे... कसला?
ती : काहीही. कोडी घालू झिम्मा खेळू, लपंडाव, पळापळी, कब्बडी... नही तो सुविचार-सुविचार.
समीरा : उससे क्या होगा?
ती : एखादा तरी जगण्याचा सार समजावेल.
समीरा : स्वच्छ व्हायचंय मला मोकळं व्हायचंय.
ती : पाण्याने बाह्यअंगाची तर सदाचाराने अंतरंगाची शुध्दी होते.
समीरा : दुसऱ्याला कमी लेखण्याची संधी शोधू नका. स्वत:ला सिध्द करण्याची संधी सोडू नका.
ती : मला वाटतं ज्याला समाधान तोच भाग्यवान!
समीरा : पण आपण म्हणतोच ना की सर्वोत्तम घडेल अशी आशा करा. परमेश्वर देईल ते स्विकारा.
ती : यार! शक्ती भक्ती आणि युक्ती या त्रिशंकूवर परमेश्वराचा वास असतोच की.
समीरा : I agree अगं पण शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठच र्लीीं युक्ती सांगायलासुध्दा शक्ती असावी लागते. शक्त ीहिनाच्या युक्तीला कोणी विचारत नाही.
ती : Let’s see एक नियम अखंड चालवणे याचं नांव तपश्चर्या.
समीरा : काहीतरी ठरवणं आणि खरोखरीच तसं करणं यात खुप फरक आहे. मला परिपूर्ण बनायचंच...(संगीत सुरु होतं बडबड चालूच आहे. ती समीराच्या हातात काहीतरी देते आणि काही कळायच्या आत समीरा रडू लागते.. संगीत वाढतेच आहे. समीरा हुसमूसून रडतेय....इतक्यात त्यांच्या समोरुन तो माणूस जातो. समीरा दचकते...तो माणूस हसून जातो..)
समीरा : किती वेळ झाला मी रडतीय आणि तूही मला अडवलं नाहीस आणि त्या माणसाला काहीतरी सांगितलंस म्हणून तो हसत गेला. I think मी जेव्हा रडत होते तेव्हा तू देखील (हसत)...
ती : रडतच होते आतल्या आत.. झालीस ना मोकळी...
समीरा : पण मग मी का? रडले आणि इतकी! आणि इतकं रडण्यासारखं काहीच झालं नव्हतं. मस्तपैकी गेम चालला होता. पुस्तकाची पानं पलटावी तसा संक्षिप्त जीवनाचा आराखडा उमगत होता. पणा मग अचानक तू माझ्या हातात काहीतरी दिलस... hey hey..wait..wait… तू माझ्या हातात काहीतरी दिलंस आणि मला काही कळायच्या आत मी रडू लागले कितीतरी वेळ रडतचा राहिले. काय दिलंस सांग ना!
ती : ग्लिसरीन.
समीरा : छे! ग्लिसरीन नव्हतं ते, मला ओळखता येतात खरे अश्रू कोणते आणि खोटे कोणते? माझा ओघळणारा एक एक अश्रू जणू भूतकाळाने गच्च होऊन बाहेर पडतानाची मी जाणीव अनुभवलीय. I think खूप वर्षांचं साठलेलं असावं. ारळश्र वर कसे आपण वाचून झालेले किंवा outdated massages जसे बल्कमध्ये डिलीट करतो ना तसं, एकदम मोकळं रिकामं नव्यानं भरणा करण्यासाठी सज्ज ! एखाद्या झीेीींर्ळींीींश प्रमाणे नटून थटून तयार असल्यासारखं वाटतंय. ऋरलश the new situation ऐ ीी सांग ना ऊशरी काय दिलंस तू?
ती : Feelings.
समीरा : What?
ती : Yes, feelings.
समीरा : बाजारात मिळतात? पाहिली नाही कुठं?
ती : सध्या ती मी रिटेल स्वरुपातच देते. थोडी जपून distribute करावी लागते. नही तो ये मॉलवाले ये भी बेचने लगेंगे. तो आपला बिझनेस नाही तर मी तुला feelings दिल्या जेणे करुन तू बोलावस पण तुझ मन इतकं भरभरुन वाहत होतं की, मला शब्दांची गरजच भासली नाही. Now I feel better.
समीरा : अगं वेडे मग डील करुन टाक. तू मला आनंद दे म्हणजे मीही सुखी आणि तूही.
ती : मी कशी? समू तू जेव्हा रडत होतीस तेव्हा..... I mean ....मला गप्पच बसावं लागलं because I am feelingness! आता मला सांग मी जर तुला... Hey समू चल आपण पुन्हा गेम खेळू.
समीरा : Please stop this game…. मला आनंद दे....मला कोणतीही feeling दे I want it, give me, please give me….
(अंधार)
----------------------------------------------------------
क्रमश:
-----------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा.

फ्लश आउट- भाग २


समीरा       : रिडीक्यूलस ..... तुझ्यात ना उरमटपणा भरलाय ठसठसून.
ती              : असेल.  तो प्रत्येक माणसात असतो.
समीरा       : म्हणजे माझ्यात उरमटपणा आहे असं म्हणायचय. You ss.
ती              : Dear जानू... चूकीची स्टेटमेंट करतीयस.  मी आक्रमकता म्हणाले & जानू चिडू नकोस.... तू जोपर्यंत तुझं नाव सांगत नाहीस तोपर्यंत मी जानूच म्हणणार.
समीरा       : नाही सांगणार.  काय कंम्पलशन आहे.
ती              : ठसठसून
समीरा       : तुझ्या तोंडात लसूण (ती हसते.... समीरा ही हसण्याचा प्रयत्न करते)
ती              : कविता लिहतेस का गं?
समीरा       : हं. शाळेत असताना करायचे कविता....
ती              : तशा नाही गं.  शाळेत असताना कोणीही कविता करत.
समीरा       : तू काय मी किती प्रगल्भ आहे याची परीक्षाच घेतेस जणू
ती              : चला दोघी मिळून गाणी म्हणू.... बघ झाली ना कविता.... (समीरा पण किंचित हसते) So आज Saturday ला काय प्रोग्राम आहे.
समीरा       : Nothing special वही पुराना घिसा पिटा प्लान.  मूव्ही पॉपकार्न, गोलगप्पा & Night का pub, dance & vodaka!
ती              : Oh! oh vodaka । ः..
समीरा       : Only vodaka!
ती              : तू इंटर द ड्रॅगन पाहिलायस?
समीरा       : शी! बुवा आता त्याचा इथं काय संबंध (ती आणखी प्रश्न विचारु का उत्तर देतेस.  अशा खुणा करते) नको तू आणखी काही विचारु नकोस.  पाहिलाय मी सिनेमा.
ती              : किती वेळा?
समीरा       : 2 - 2 वेळा
ती              : मग आणखी एकदा पहा
समीरा       : Why?
ती              : जरा तुझ्या मेंदूला त्रास देऊन चित्रपट आठव इथं तुझ्या स्मरणशक्तीला वाव आहे.
समीरा       : तूला कसं माहिती की हल्ली माझ्या काही लक्षात राहत नाही ते.  हल्ली सर्व गोष्टी रिमांडरमधे save करायली लागलीय.
ती              : बोलू
समीरा       : Ya! please
ती              : thank you.. तर एका प्रसंगात एक तरुण फायटर मॅच खेळत असतो आणि इकडे आपला ब्रुसली.
समीरा       : आपला?
ती              : माझा ..... ऐक तर खरं, तर ब्रुसली त्या तरुणाचं निरीक्षण करत असतो.  त्याचा खेळ पाहून तो इतकच म्हणतो की अंगात नुसता जोश असून चालत नाही तर त्यात इमोशन भर, त्या कामात भावना ओत.  या लाईफ मध्ये स्ट्रगल करताना कधी हरणार नाहीस.
समीरा       : पण भावनेच्या आहारी जाऊन माणसं फसताना पाहिलीयत मी
ती              : यारा! मी केवळ भावना अस म्हणालो नाही.  जिद्द चिकाटी परिश्रम याबरोबर भावनेची सांगड घालावी.
समीरा       : याने.  मैने जिंदगी में..... कोई भी काम (सुस्कारा) म्हणजे तुला अस म्हणायचं आहे मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक कृती भावनाशिवाय केली?
ती              : Yup! (बराच वेळ शांतता..... समीरा पर्समधून सिगरेट काढते.  ती समीराच्या हालचाली बघतीय.... सिगरेट पेटवत नाही.  थांबून.)
समीरा       : म्हणजे तू मेरे जिंदगी को Direction देगी.  मग तू डेलीसोप करणार की साप्ताहिक.
ती              : Hey तू तर एकदम टंपर निघालीस.  अपूुरू ना साप्ताहिक ना डेलीसोप और समझले मैने किया भी तो यकीनन तू बोअर हो जाओगी.  Then you सर्च ब्लडी प्रायोजक.
समीरा       : प्रायोजक? Means?
ती              : प्रायोजक Means ःः व्यसन.  Tention व्यसनाला जन्म देते असं कोणी तरी म्हटलय ना!
समीरा       : कोणी म्हटलयं?
ती              : असं म्हणायची पध्दत असते.  आणि तुला असं वाटत नाही का जानू आपलं विषयांतर होतय.
समीरा       : पण तुझाच होता ना सॅटरडे नाईट मधे .... हं.
ती              : माझा? No wayः.. सर्वांचीच चर्चा चालली होती ना आणि तू सुध्दा full too तयारी निशी आहेस ना?
समीरा       : जे जे आयुष्यात येतं ते enjoy करावं अस वाटत ना कधीकधी.  उद्या कोणी बघितलय?
ती              : क्षणात मोठया बाईसारखी बोलायला लागलीस.  जिचं सर्व काही जगून झालय.
समीरा       : मृत्यूला काय घाबरायचं.  नीट जगता येत नसेल तर मरायला काय हरकत आहे?
ती              : धर्ेी ाशरप आत्महत्या!
समीरा       : कित्येकदा वाटलं देखिल.  पण नाही आलमरण
ती              : जीव जायचा तेव्हाच जाणार.  तो काय भिखारी आहे. इतने सालों की भीख डाल दी उसकी झोली में और कहा, जाओ.  उसमे अपनी मर्जी थोडीही होती है!
समीरा       : I don’t know आपण इतक कसं बोलतोय.....
ती              : बोलतोय हे कमी आहे का?
समीरा       : मी बोलू.....
ती              : बोल ....
समीरा       : मला ना कधी कधी वाटतं की आपलं जगून झालयं...., ज्याच्यावर मनापासून प्रेम करावं अस माणूस आपल्याला भेटल.  हेच खूप!  जर त्याने ते स्विकारले असते तर
ती              : जह! तो ऐसा झमेला है फिर ....Breakup…. येडचाप, तुला जर स्वत: त्याच स्वत:ची मदत करावी असं वाटत नाहीय इतरांनी आपल्या विषयी प्रेम बाळगावे.  सोबत करावी अशी कशाला अपेक्षा करतीस? आणि तुझं वय आहे काय मरणाबिरणाचं बोलायचं? इतकी काम दिसतायत.  बरच काही करायचं आहे तुला आयुष्यात, पळ कशाला काढतेस?
समीरा       : I know जगात राहणं काहीतरी करुन दाखवणं हे चांगलच आहे.  but I फिल मरण ही फार सुंदर गोष्ट आहे.  वेदनेच टोक इतक सुंदर असंतकी त्यावरुन सुटणं... हा अनुभव सुंदर so I like deth.
बबबघाबरुन जावं अस काही असेल तर ते आयुष्यात, मरणार नाही.  मृत्यूला काय घाबरायचं? तो तर सगळया भयांचा अंत. fear means Darkness & Death means light.  मृत्यू नसता तर जन्मायला जागाच नसती!  मला वाटत आयुष्यात विश्वसनीय काय असेल तर ते म्हणजे मृत्यू .... साला....कसे जगू सांगता येणार नाही, पण मरणार हे माहिती असतं.
ती              : ये भग्गू.  अजून तुला बरच काही करायचं आहे लहान आहेस. हे सगळं ती मोठमोठाली पुस्तक वाचून होतयं.  भेंडी.... तुम्ही लोक ना प्रेशर खायला सुध्दा दुसऱ्यांची दु:ख वाचत बसता कसं साफ होणार पोट.
                                मुझे लगता है हमे अपनेबारेमे बात करनी चाहीए।  अगदी थेट, दुसऱ्यांची expression होऊन अपने सवाल नही छुटते.... नाहीतर मग हे असं होतं.  प्रेशर आणायला पुस्तक .... (हसायला लागते .... समीरसुध्दा थोडीच हसते.)  काय आहे.  स्पॉन्सर्ड हास्य वाटत असले तरी मी नेहमीच हसत असते.
समीरा       : स्पॉन्सर हास्य म्हणजे?
ती              : सगळे हसतात म्हणून आपणही हसायचं, त्याला स्पॉन्सर हास्य म्हणायचं.
समीरा       : You mean माझ्या हसण्यात कृत्रिमता आहे?
ती              : वा!
समीरा       : कशाबद्दल वा!
ती              : तुला कळतय का येडचाप मगापासून तू मला कितीतरी प्रश्ने विचारतेस आणि मी उत्तर देतीय good keep it up.
समीरा       : (सिगरेट काढते..... खेळते) मगाशी तू Direction बद्दल काहीतरी बोलत होतीस.  Direction म्हणजे नेमक काय करणार तू
ती              : म्हणजे तुला सत्य जाणून घ्यायचय तर!
समीरा       : अर्थात!
ती              : तुझे पता हम लोग ना.  प्रत्येक गोष्टीची कुठल्या कुठल्या गटात विभागणी करतोच.  मग ती स्त्री-पुरुष असो, हुशार - ढ असो, देव मानणारे अथवा न मानणारे गमत म्हणून सांगते नीट ऐक या सगळया विभागणीत एक गट कायम वेगळा असतो आणि समजतो सुध्दा.  बिच्चारे! शोध लावण्याशिवाय पर्यायच नसतो या शास्त्रज्ञांना....
समीरा       : गंमत काय आहे....
ती              : समाजाने ठरवून दिलय की शास्त्रज्ञ म्हणजे अमक्या तमक्या गोष्टीवर विश्वास नसतो, आणि जरी तरी तो ठामपणे दाखवू शकत नाही.  खरं म्हणजे त्यांचा कुठल्या गोष्टीवर विश्वास असतो.  हेच मुळी आपण पाहत नाही.  सत्य शोधण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्या कृतीवर, विचारावर आपला स्वत:चा विश्वास पाहिजे.  आणि तो ठामपणे इतरांना पटवून देता आला पाहिजे.
समीरा       : याने इतनी क्वालिटी अगर हममें होतो हम scientist बन सकते है।
ती              : (हसते) तू फार हसत जरी नसलीस तरी झग मारण्यात पटाईत आहेस जानू.
समीरा       : Hey.  Wait bady….. मी माझी ओळख करुन देते.... I am समीरा CFX कंपनीत एझ्क्यूटीव्ह आहे.  चांगला स्वभाव चांगली नोकरी चांगल घर आईवडील बहीण भावंड सगळ काही चांगलं.....
ती              :          आणि चांगला नवरा .... (ती रागाने बघते) जह. Sorry… विसरलेच मी..... लगेच अपसेट कसली होतीस take it easy your.. चल toast for this.. काहीतरी पिऊया.....vodaka!
समीरा       : नको..... vodaka प्यावी पण मजा येईपर्यंत... रडायला अनेक कारण आहेत.  त्यासाठी पैसे खर्च करुन दारु प्यायची.  पिऊन रडून नाही आलं पाहिजे.
ती              : good…. यू आर राईट मजा कर बाई मजा कर.... बाकी काय, कमी अधिक फरकानं सेमच असतं, टिकली पुरता नवरा समूबाई.  दाखवू नको तुझा तोरा.  तुझा बिछाना माझ्यावानी कोरा.  स्ट्रोल घेऊन उगाच फिरा नाच रे मीरा!
                                    (दोघी हसतात.... त्यांच्या समोरुन एक माणूस जातो.  दोघीही स्तब्ध... तो बघून निघून जातो.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा



फ्लश आऊट भाग १

स्टेजच्या उजव्या कोपऱ्यामध्ये एक दरवाजा आहे पांढऱ्या रंगाचा. पडदा बाजूला जाण्यापूर्वी आवाज ऐकू येतात. हलक म्युझिक ऐकू येतं. आवाज- तो साक्षी आज क्या प्रोग्राम है। मुलगी - कुछ नही हर सॅटरडे की तरह. वही घिसापीटा प्रोग्राम. मुलगा - याने आज फिर कोई बकरा. मुलगी - अरे तन्वीर तू आता है क्या बोल तेरे को भी किसी से मिला देंगे. हमारे साथ तू तो आयेगा नही. मुलगा - क्यो? सर्व मुली - अरे जिथं पिकत तिथं विकत नाही. सर्व हसायला लागतात. पडदा वर जाऊ लागतो. दरवाजा उघडून आत येते. तेवढयात एकजण आवाज देतो. Hey समीरा कुठे चाललीयस? समीरा - अरे त्या डफारला समजवारे..... कोणी तरी. बाथरुममधे काय करायला जातात लोक......
एकजण : अग तस नाही.
सर्वमुली : ये चूप ये..... तस त्या भानगडीत नाक खुपसू नकोस. (तेवढयात समीराला भास होतो की आपण बाथरुम ऐवजी कुठे भलतीकडेच आलोय. ती परत दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागते. बाहेरचा आवाज वाढतो. कलकल वाढतीय.
एकजण : काय गं. कसला विचार करतीयस आणि दारातच उभी राहणार आहेस का?
समीरा : अग आत खूप अंधार आहे.
मुलगी : अरे हा! भेंडी तू काल नव्हती ना म्हणून तुला तो चेंज माहिती नाहीय. अग पलिकडे बांधकाम चालूय so windows block केल्यात. That’s why अंधार आहे. Hey समू कसला विचार करतीयस?
समीरा : नाही काही, ए ऽऽ दिशा माझी पर्स देना. लिपस्टिक आहे त्यात. इथच फे्रश होईन.
मुलगी : वेडाबाई देते थांब ...... धर. अग लाईट लाव आणि जा आत. नाहीतर हा परत विचारेल समीरा कुठे चाललीयस (फिदी फिदी हसतात)
(एकजण : बॉसनी कंडीग संदर्भात Next plan 4 वाजता मिटींग बोलवलीय.
सर्व : माहितीय रे. (बोलणं वाढत जात हसणं, खिदळणं. समीरा जस जसा दरवाजा बंद करायला जाते. तसा आवाज आणि म्युझिक वाढत जाते. दरवाजा बंद होत सर्व शांत.
समीरा : शीट्. आता हा स्वीच कुठे गेला डफर! Yes finally got it. (स्वीच ऑन तिच्या लक्षात येत की आपण कोणत्या तरी वेगळयाच ठिकाणी आलोय. घाबरते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते उघडत नाही. दिशा तन्वीर हाका मारते. मेघना ऽऽ शीट्. वैतागते. रडवेली होते. म्युझिक वाढतेच आहे.
समीर : (पर्समधून मोबाईल काढते. फोन लावण्याचा प्रयत्न करते. लागत नाही.) ब्लडी hell. ये नेटवर्क को अभी क्या हो गया. oh! God…. but मी एवढी पॅनीक का होतीय. नाही लागला तर, नाही, लागला ना फोन! duffer add तर कशी करतात. नेटवर्क सदैव तुमच्यापाठी. so ब्लडी duffer, dogi where r u? (तेवढयात तिला डाव्या कोपऱ्यात एक बेंच वर एक व्यक्ती बसल्याचा भास होतो. हळूहळू समीरा त्या बेंच जवळ जाऊ लागते.)
समीरा : who are you? आणि तू इथे काय करतीयस......
ती : वाट पाहतीय...
समीरा : मी बसू इथे थोडावेळ.....
ती : बस ...हा बाक, माझ्या बापाच्या मालीकाचाच थोडी आहे.
समीरा : तू इथे केव्हा पासून आहेस?
ती : जेव्हापासून तू लोकांना आणि मोबाईलला शिव्या घालत होतीस ना तेव्हापासून आहे मी इथं.
समीरा : What?
ती : अपूुरू काय म्हणतीयस कशी आहेस जानू?
समीरा : माझं नाव जानू नाहीय
ती : अगं प्रेमान म्हणाले मी... जानू ... (हसते), मग तूच सांग ना तुझं नाव...
समीरा : का?
ती : हे बघ, आता तू माझ्या शेजारी बसलीयस. तेव्हा सुरुवात तर औपचारिकतेने व्हावी. डे, नाहीतर हल्लीच्या माणसांमधे कुठे होतात संवाद.
समीरा : हं ...(समीरा वैतागून उभी राहते.)
ती : काय ग आवडली नाही?
समीरा : काय?
ती : सुरुवात.
समीरा : कशाची?
ती : संवाद साधण्याची.
समीरा : अगदीच तसं काही नाही...
ती : मग बसना, भेंडी ....
समीरा : मी काय तुला भेंडी सारखी दिसतेय.
ती : खुळचट भेंडी शिवी आहे.... भाजी नाय....
समीरा : नाही मी इथेच ठिक आहे.
ती : ठिक आहे. याने सिधी उंगली से घी नही निकलेगा.
समीरा : थहरीं? काय म्हणालीस.
ती : मी म्हणाले, बरेच आढेवेढे घेत ओळख करुन घ्यावी लागणार.
समीरा : तू मला प्रश्न काय विचारतीयस. Boss सारखे.
ती : कारण तू विचारत नाहीयस म्हणून.
समीरा : काहीतरी फालतू बोअर जोक्स मारु नकोस. कंटाळा येतो मला.
ती : आक्रमक आणि मितभाषी आहेस.
समीरा : आणि तू कोण श्वेता जुमानी की तीन देवियाँमधील एक देवी आहेस?
ती : (हसते) नाही का?
समीरा : नाही लगेच माझ्या स्वभावावर घसरलीस ते.
ती : कामाचा वैताग आलाय?
समीरा : आलाय! मला कामाचा वैताग आलाय. काय करणारायस तू? अं.
ती : आक्रमकता ठसठसून भरलीय तुझ्यात.
ती : काय?
समीरा : श्यॅ! पुन्हा प्रश्न शाळेत काय प्रश्नपत्रिका चावून खायची की काय तू. (ती हसायला लागते)
समीरा : ते काही नाही आता मी तुला प्रश्न विचारणार और तुम्हे उसके answer देने होंगे.
ती : कैसे?
समीरा : Oh! तुने फिरसे question किये? अब तू चूप रहने का. चूप याने एकदम चूप.
ती : Yes
समीरा : Now tell _r who r u? तुम्हारा नाम क्या है? (ती गप्प .... ) Hey baby what happened. हं. आता का बोलती बंद झाली बोल.
ती : तूच म्हणालीस ना. गप्प म्हणजे गप्प.
समीरा : तू ऽऽ .....
ती : (हसते) Sorry जानू विचार
समीरा : माझं नाव जानू नाही... (ती बोलायला जाते.) आणि आत्ता प्रश्न विचारायला माझा turn आहे तूझा नाही.
ती : Ok
समीरा : तूझं नाव?
ती : जानू Don’t पॅनिक पण एक गोष्ट सांगू तू ना सगळं अपूर्ण वर्तमान काळात बोलतीस.
समीरा : तुझं नाव काय?
ती : अगं नावात काय आहे असं हज्जारदा ऐकलं असशील.
समीरा : आज परत ऐकलं.
ती : त्याच काय आहे माहितीय का? हल्ली मी नाव सांगायचं टाळते. उगाच धार्मिक वाद उद्भवतात.
समीरा : मला तुझी फिलॉसॉफी ऐकण्यात काही एक इंटरेस्ट नाहीय.
ती : आक्रमकता!
समीरा : तुझं नाव?
ती : नाही सांगणार
समीरा : का तू तेवढे प्रश्न विचारायचे आणि मी विचारलंकी उत्तर द्यायचं नाही.
ती : मी उत्तरचं दिलय ..... नाही सांगणार
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा

चौकोनी त्रिकोण (भाग ३)




बायकोच्या गुणगुणण्याचा आवाज ऐकू येतोय. हळू हळू लाइट्स लागतात. नवरा घाई घाईत आत येतो. आवरा आवर करतोय.

नवरा - आणि काय गं, आज तू का इतकी खूश आहेस?
बायको - आज माझ्या मुलीला बघायला येणार आहेत...
नवरा - अगं तेच विचारतोय, मुलीला बघायला येणार आहेत... तू का खूश आहेस?
बायको - अहो तुम्हाला आपला बघण्याचा कार्यक्रम आठवतो... किती मजा आली होती ना...
नवरा - हो ना... खरंच गंमत झाली होती. चुकून तू नेहमी प्रमाणे साखरे ऐवजी मीठ टाकल्याने एका वेगळ्याच चवीचा चहा प्यावा लागला होता मला...
बायको - तरी एरवी पेक्षा खूप छान झाला होता असं माझी आई म्हणाली, माणसाच्या हाताला चव असली की सगळं छान बनतं...
नवरा - त्यावेळी अजून एक गंमत झाली होती, जी मी तुला सांगितली नाही... आज सांगतो...
बायको - तुम्ही पायरीवर पाय घसरून पडलात ते ना, माहिती आहे मला, मी वरून बघितलं...
नवरा - हो का?
बायको - हो ना, नंतर तुम्ही तुमच्या वडिलांना म्हणालात मला कुणी तरी हसल्याचा भास झाला...
नवरा - हो अगं, खरंच वाटलं होतं मला कुणी तरी हसल्यासारखं...
बायको - तो भास नव्हता... मीच हसले होते...
नवरा - छान... पण मला सांगायची आहे ती ही गंमत नव्हे...
बायको - मग हो?
नवरा - आम्ही आल्यावर तुझी आई गूळ पाणी घेऊन आली... तिला बघून मी पटकन बाबांच्या कानात सांगितलं 'मला मुलगी पसंत आहे...'
बायको - काय???
नवरा - अगं मला वाटलं तीच नवरी मुलगी आहे...
बायको - धन्य आहात...
नवरा - शेवटा पर्यंत तुझा चेहरा काही मला दिसला नाही... शेवटी मी आईवरून अंदाज बांधून तुला न बघताच होकार दिला...
बायको - आणि आयुष्याचं सोनं झालं तुमच्या... अहो मी म्हणून तुमच्याशी लग्न केलं... मला किती चांगली चांगली स्थळं सांगून आली होती...
नवरा - मग माझ्यातच काय पाहिलंस?
बायको - तुम्हाला बघून मला कळलं की तुम्हालाच माझी जास्त गरज आहे... इथे माझ्या कर्तृत्वाला वाव आहे...
(नवरा बायकोला कोपरापासून हात जोडून नमस्कार करतो.)
बायको - किती वाजता येणार आहेत हो मुलाकडचे?
नवरा - मुलाकडचे नाही, मुलगा एकटाच येतोय... येईलच इतक्यात...
बायको - कार्टी कुठाय? उठली तरी आहे का?
नवरा - पार्लर मध्ये गेली आहे...
बायको - आणि चहा पोह्यांचं काय? तुम्ही करणार?
नवरा - नाही गं, तिला विचारलं मी तर म्हणाली बाहेरूनच काही तरी आणीन... गिरीष तिला म्हणाला का उगाच त्रास???
बायको - शी... त्यात काय बाई त्रास...
नवरा - वा वा... असा कसा त्रास नाही??? त्याने कधी तरी खाल्लं असेल तिच्या हातचं...
बायको - काहीही बोलू नका... तिला जमतं बऱ्यापैकी... अगदी माझ्या इतकी सुगरण नसली तरी जमेल हळू हळू...
नवरा - तुझ्या इतकी सुगरण नाहीये तेच बरं आहे...
बायको - दुसरं काही नाही तरी सासूबाईंचा खवचट पणा घेतलाय हो तुम्ही...
नवरा - अगं मेलेल्या माणसाविषयी असं बोलू नये...
बायको - मेलेल्या माणसाविषयी मेलेल्या माणसाने बोललं तर चालतं...

(डोअर बेल वाजते)
बायको - आले वाटतं जावईबापू...
नवरा - होणारे जावईबापू... अजून निर्णय घ्यायचाय...
बायको - अहो पण पमी ने ठरवलंय ना???
नवरा - ती बरंच काही ठरवते, पण हा निर्णय तिला एकटीने घेऊ देणार नाही...

(डोअर बेल पुन्हा वाजते)

बायको - अहो... गप्पा काय मारत बसलात वेंधळ्यासारखे... दार उघडा बघू लवकर...
नवरा - हो हो...

(नवरा दार उघडतो आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. )

नवरा - अरे या या या... तुम्ही आलात ते फार बरं केलं गुरुजी. आमचे होणारे जावई येतीलच इतक्यात...
ज्योतीषी - तुम्ही इथे कसे???
नवरा - अहो मी इथेच राहतो...
ज्योतीषी - काय नाव तुमच्या मुलीचं?
नवरा - अहो सांगितलं की त्या दिवशी, कालिंदी...
ज्योतीषी - मग ठीक आहे... मी चुकीच्या पत्त्यावर आलोय बहुतेक...
नवरा - काही का असे ना, तुम्ही आता आला आहात तर थांबा थोडा वेळ...
ज्योतीषी - अहो मला दुसरीकडे जायचंय महत्त्वाच्या कामासाठी...
नवरा - फक्त थोडावेळ थांबा प्लीज...
ज्योतीषी - अहो मी व्हिझीटचा चार्ज वेगळा घेतो...
नवरा - किती???
ज्योतीषी - रुपये २००० फक्त...
नवरा - बरं, देतो. पण तुम्ही थांबाच.
ज्योतीषी - बरं थांबतो... (गिरीष पमीला कॉल करून सांगतो की तो महत्त्वाच्या कामात अडकल्याने त्याला उशीर होईल. )
बायको - अहो... ह्यांनीच पत्रिका बनवली का...
नवरा- हो... हेच ते...
बायको - त्यांना विचारा काही उपाय आहे का त्यावर... जास्त महाग असेल तर करू नका...
नवरा - अगं काय बोलतेयस?
ज्योतीषी - कुणाशी बोलताय हो???
नवरा - स्वतःशीच...
ज्योतीषी - मी त्या दिवशी तुम्हाला इतकं सांगूनही तुम्ही मुलीचं लग्न करायचं ठरवलंतच ना...
नवरा - अहो मी नाही ठरवलं, मुलीनेच ठरवलंय परस्पर...
ज्योतीषी - तुमच्या जावयाला कल्पना आहे ना?
नवरा - आमच्या जावई कोण आहे ह्याचीच आम्हाला कल्पना नाही अजून... द्या टाळी... हॅ हॅ हॅ...
ज्योतीषी - हॅ हॅ हॅ (गिरीष कपाळाला हात लावतो.) अहो कधी येणार जावई तुमचा? मला निघायचंय...
नवरा - अहो २००० फक्त रुपये घेतलेत ना? आता २० मिनिटं तरी थांबा...
ज्योतीषी - अहो तो व्हिझीटचा चार्ज, वेटींगचे पैसे वेगळे...
नवरा - बरं, हाफ मीटर करून ठेवा...
बायको - काय मेला हावरट आहे... नुसतं थांबायचे २००० घेतले, वर अजून पैसे मागतोय...
नवरा - हा कधी तावडीत आला की बघच कधी वाट लावतो ह्याची... खूप लुबाडलंय मला ह्याने... (गिरिषला) मी आलो चहा घेऊन...
ज्योतीषी - घेऊन येताय म्हणजे तुम्ही घेऊन येताय की आपल्यासाठी घेऊन येताय?
नवरा - आपल्यासाठी आणतोय... तुम्ही किती घेणार? अर्धा कप की फुल कप?
ज्योतीषी - मी...
नवरा - अर्ध्या कपाचे ५ रुपये, पूर्ण घेतलात तर ८...
ज्योतीषी - मी बाहेरून पिऊन येईन...

(नवरा चहा घेऊन येतो)

नवरा - घ्या... आणि सांगा कसा झालाय...
ज्योतीषी - (चहाचा घोट घेतो) ह्या चहाचे मी फार फार तर २ रुपये देईन...
बायको - अजून कसे नाही आले जावईबापू?
नवरा - होणारे जावईबापू...
बायको - तेच ते...
ज्योतीषी - कोण आहे तो माणूस ज्याने तुमच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंय?
नवरा - मलाही बघायचंय त्याला...
ज्योतीषी - त्याला जेव्हा कळेल की त्याच्या भविष्यात काय हे तेव्हा मला त्याचा चेहरा बघायचाय... मंडपातून त्याची वरात डायरेक्ट जेल मध्येच जाणार आहे... हॅ हॅ हॅ
नवरा - ह्या विनोदावर मी नाही हसू शकत...
ज्योतीषी - हसून घ्या हो... शेवटच्या दिवसात माणसाने आनंदी राहावं...
बायको - कार्टी काय करतेय पार्लर मध्ये इतका वेळ? इतक्या वेळात म्हशी धुऊन होतात...
नवरा - कालिंदी कशी नाही आली अजून???

(डोअर बेल वाजते)

नवरा - कुणी तरी आलं...
ज्योतीषी - बेल वाजली म्हणजे कुणी तरी आलंच असणार...
नवरा - हो ना... कारण नसताना आवाज करायला बेल म्हणजे काय माझी बायको आहे... हॅ हॅ हॅ...
बायको - अहो... गप्पा काय मारत बसलात वेंधळ्यासारखे... दार उघडा बघू लवकर...

(नवरा दार उघडतो.. )


नवरा - काय गं कार्टे इतका वेळ काय करत होतीस पार्लर मध्ये???
पमी - गिर्‍या??? तू कधी आलास? उशीरा येणार होतास ना???
नवरा - अगं ह्याच गुरुजींनी तुझी पत्रिका बनवली...
पमी - काय???
ज्योतीषी - अगं पण तू इथे कशी???
पमी - मी इथेच राहते... हे माझे बाबा...
ज्योतीषी - काय??? हा तुझा... हे तुझे बाबा???
पमी - हो...
नवरा - तू कशी ओळखतेस ह्यांना...
पमी - अहो ह्याच्याशीच मी लग्न करायचं ठरवलंय...
नवरा - काय??? हे माझे... हा माझा होणारा जावई???
पमी - हो... कसा आहे? सांगा ना...
बायको - नालायक आहे... हलकट आहे... लोभी आहे... तुझ्या बापाला लुबाडलंय ह्याने अडचणीत पकडून...
नवरा - अरे देवा... हे काय केलंस??? ह्या माणसाच्या हातून माझा खून होणार आहे??? हा मला मारायचेही पैसे घेईल माझ्याचकडून...
पमी - काहीही काय बोलताय बाबा?
नवरा - अगं तुझ्या पत्रिकेत लिहिलंय की तुझ्या नवर्‍याच्या हातून माझा खून होणार आहे?
पमी - काय??? हे खरं आहे का रे???
ज्योतीषी - (चाचरत) हो...
नवरा - अगं पण मला एक कळत नाहीये
बायको - तुम्हाला कुठे काही कळतं?
नवरा - मला एक कळत नाहीये अख्ख्या जगात हाच एक प्राणी सापडला का तुला लग्न करायला?
पमी - बाबा...
नवरा - काय?
पमी - बाबा...
नवरा - अगं काय???
पमी - सांगू...
बायको - सांग आता लवकर नाही तर थोतरवीन...
पमी - माझं जग किनई ह्याच्यापासूनच सुरू होतं नि ह्याच्यापाशीच संपतं...
नवरा - माझं पण...
ज्योतीषी - सासरे बुवा...
नवरा - मिस्टर आपटे म्हणा... जावई झाला नाहीत तुम्ही अजून... किती वर्ष ओळखताय एकमेकांना...
ज्योतीषी - ३-४ वर्ष...
नवरा - हिला भेटायला येताना हिच्याकडून पण गाडी भाड्याचे पैसे घेता का?
ज्योतीषी - अहो काहीही काय बोलताय... माझा खर्च मी गिर्‍हाईकांकडून भागवतो... बरेच बकरे भेटतात...
नवरा - काय???
बायको - अहो, ह्या खाटकाच्या हातात मला माझं कोकरू द्यायचं नाही... आधी ह्याला घरातून बाहेर काढा...
नवरा - तुझ्या सारख्या खाटकाच्या हातात मी माझी मुलगी देणार नाही...
बायको - अहो... नवीन डायलॉग मारा ना काही तरी...
नवरा - तुझ्या सारख्या नराधमाच्या हातात मी माझी मुलगी देणार नाही...
ज्योतीषी - अहो असं मी काय केलंय???
नवरा - आत्ताच्या आत्ता चालता हो माझ्या घरातून...
ज्योतीषी - अहो पण माझे २००० रुपये...
नवरा - बघितलंस... बघितलंस....
पमी - बाबा... असं काय पाप केलंय ह्याने...
नवरा - अगं हा म्हणजे माणूस नाही... जळू आहे... जी एकदा चिकटली की ज्याच्या अंगावर आहे त्याचंच रक्त शोषते...
ज्योतीषी - अहो जळू रक्त शोषण्यासाठीच चिकटते...
नवरा - हा लोकांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेतो... त्यांना लुबाडतो... खोटी आश्वासनं देतो... हा लोभी आहे... हा नीच आहे... हा हा आहे...
ज्योतीषी - मी मीच आहे...
नवरा - हे लग्न होणं कदापि शक्य नाही...
ज्योतीषी - अहो पण का???
नवरा - माझी मरायला ना नाहीये... पण मी ह्याच्या हातून मरणार नाही... ह्याने मला मारणं म्हणजे मुंगी ने हत्तीला मारणं, उंदराने सिंहाला मारणं, प्याद्याने वझीराला मारणं...
बायको - ओ.... बास झालं....
नवरा - मी ह्याच्या हातून मरणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही...
पमी - अहो पण का???
नवरा - कार्टे मी का मरणार नाही असं विचारतेस???
पमी - नाही हो... आमचं लग्न का होणार नाही...
नवरा - माझी परवानगी नाही...
ज्योतीषी - मी काय म्हणतो... आपण सेकंड ओपिनियन घेऊया का???
नवरा - त्याने काय होणार आहे???
ज्योतीषी - कदाचित काही तरी उपाय सापडेल...
बायको - अहो... हा तुम्हाला पुन्हा फसवतोय...
नवरा - गप्प बस गं... कुणाचं घ्यायचं सेकंड ओपिनियन...
ज्योतीषी - ओरिजिनल जोशी ज्योतीषी...
पमी - मग तू कोण आहेस...
ज्योतीषी - मी लेटेस्ट जोशी ज्योतीषी. वर्जन २.०...
नवरा - ओ २.०, बोलवा तुमच्या बाबांना आत्ताच्या आत्ता...
ज्योतीषी - त्यांचा चार्ज वेगळा आहे, आमचं पॅकेज डील नाहीये...
(नवरा ज्योतिष्याच्या अंगावर धावून जातो)
ज्योतीषी - बोलावतो... बोलावतो... (ज्योतीषी बाबांना मोबाईलवरून कॉल करतो)
ज्योतीषी - बाबा... पटकन मी सांगतो त्या पत्त्यावर या... एका पत्रिकेवर सेकंड ओपिनियन घ्यायचंय... अहो ते पैसे मी देईन… तुम्ही असाल तसे निघा... अहो हो, कपडे घालून निघा... येतायत बाबा...
नवरा - त्यांचे पैसे मी अजिबात देणार नाहीये... हा सगळा घोळ तुझ्यामुळे झालाय...
ज्योतीषी - बघितलंस... जावई झाल्यावर लगेच एकेरीवर आला तुझा, आले तुझे बाबा...
नवरा - ए जा जा... आलाय मोठा जावई होणारा...
पमी - असं काय करता बाबा... करू द्या ना लग्न आम्हाला...
नवरा - करा की
पमी - खरंच???
नवरा - हो करा की तुम्ही लग्न... पण एकमेकांशी नाही...

(डोअर बेल वाजते)
ज्योतीषी - या बाबा या... बरं झालं लवकर आलात...
जोशी - मी घरी यायचे ७५ रुपये घेतो, पत्रिका बनवायचे ५० आणि भविष्य सांगायचे अजून ५०...
नवरा - ओ ओरिजिनल जोशी... तुमच्या मुलाने घोळ करून ठेवलाय...
जोशी - नवीन सांगा काही तरी... काय झालं???
नवरा - अहो ह्याने माझ्या मुलीची पत्रिका बनवली...
जोशी - पैसे घेतलेस ना रे???
नवरा - दिले हो... त्या पत्रिकेनुसार माझा जावई माझा खून करणार आहे...
जोशी - मग प्रॉब्लेम काय आहे???
नवरा - अहो तुमचा मुलगाच माझा जावई होणार आहे...
जोशी - तुला ह्यांचा खून करायला काही प्रॉब्लेम आहे?
ज्योतीषी - नाही...
पमी - गिर्‍या...
जोशी - मग प्रॉब्लेम काय आहे???
नवरा - अहो काही तरी काय बोलताय... तुम्हाला माझी सुपारी द्यायला बोलावलं नाहीये... ह्या अशा मुलाच्या हातून मरायला माझी अजिबात तयारी नाही...
जोशी - मग आता मी काय करावं अशी इच्छा आहे? ह्या वयात मला खून करून फाशी जायचं नाहीये...
नवरा - तुम्ही पत्रिका पुन्हा बनवा नि पुन्हा भविष्य बघा...
जोशी - मी पत्रिका बनवायचे ५० रुपये घेईन आणि भविष्य सांगायचे अजून ५०...
नवरा - देतो हो... बनवा पटापट...
जोशी - मुलीचं नाव?
पमी - पमी...
नवरा - कालिंदी, जन्म १२ डिसेंबर, सकाळी १० वाजून ३५ मिनिटे...
बायको - ओ... हिचा जन्म ११ वाजून ३५ मिनिटांनी झालाय १०:३५ नाही...
नवरा - काहीही काय अगं... तुला काय माहिती???
बायको - मुलीचा जन्म कधी झाला हे मला माहिती नसेल तर काय तुम्हाला असणार... हिचा जन्म ११ वाजून ३५ मिनिटांनी म्हणजे ११ वाजून ३५ मिनिटांनीच झालाय...
नवरा - बरं बरं... जन्म वेळ ११ वाजून ३५ मिनिटे...
ज्योतीषी - अहो मला तर तुम्ही १०:३५ सांगितलंत...
नवरा - ते जुनं झालं... ही नवीन जन्म वेळ... नाव कालिंदी, जन्म १२ डिसेंबर १९८६, जन्म वेळ ११ वाजून ३५ मिनिटे, जन्म स्थळ पुणे ३०...
जोशी - हळू हळू सांगा, तुम्ही व्यास नाही आणि मी गणपती नाही...
नवरा - नाव कालिंदी, जन्म १२ डिसेंबर १९८६, जन्म वेळ ११ वाजून ३५ मिनिटे, जन्म स्थळ पुणे ३०...
जोशी - ह्म्म्म्म.... बनवतो पत्रिका...
पमी - बाबा... दोन प्रेमिकांच्या मध्ये नका येऊ... पाप लागतं...
नवरा - कोण म्हणालं?
पमी - मी म्हणतेय...
नवरा - बापाला पाप-पुण्याच्या गोष्टी शिकवतेस??? ह्या... ह्या... अशा माणसावर प्रेम करताना लाज नाही वाटली... अगं... भूतदया म्हणूनही कुणी ह्याला जवळ नाही घेणार गं... तू काय पाहिलंस ह्याच्यात??
पमी - माझ्या नजरेने बघा म्हणजे कळेल...
नवरा - मुस्काट फोडीन...
पमी - गिर्‍या हा सगळा घोळ तुझ्यामुळे झालाय... माझी पत्रिका अशी का बनवलीस???
ज्योतीषी - अगं तुझ्या बाबांनीच चुकीची वेळ सांगितली त्याला मी काय करणार...
पमी - अरे ते सांगतील काहीही म्हणून काय तू लगेच ऐकायलाच पाहिजे असं नाही... माझं ऐकतोस??? हजार वेळा सांगितलं केसांना ते घाणेरडं तेल लावू नकोस म्हणून...
ज्योतीषी - असं गं काय करतेस???
नवरा - (गिरीषला) ए... ए... लांब हो... लांब हो...

नवरा - अहो किती वेळ लागतोय??? इतक्या वेळात शिधा पत्रिका बनवून होते...
जोशी - शिधा पत्रिकेत भविष्य दिसतं???

जोशी - झाली... बापरे हे काय बघतोय मी...
नवरा - हा धक्का मला आधी बसलेला आहे... त्यामुळे आता मी घाबरणार नाही...
जोशी - कोणत्या अवलक्षणी मुलीची पत्रिका आहे ही???
पमी - माझी आहे...
नवरा - तोंड सांभाळून बोला, माझ्या मुलीची आहे...
जोशी - आणि कोणता गाढव हिच्याशी लग्न करणार आहे???
ज्योतीषी - बाबा मी...
जोशी - अरे गाढवा ह्या पत्रिकेत काय लिहिलंय माहिती आहे का?
ज्योतीषी - माहिती आहे... मी ह्यांचा खून करणार आणि मला त्यात काही प्रॉब्लेम नाही...
जोशी - अरे मूर्खा नव्या पत्रिकेत काय लिहिलंय माहिती आहे का???
कोरसः काय लिहिलंय...
जोशी - ह्या पत्रिकेनुसार जावयाच्या हातून सासर्‍याचा नाही... तर सासर्‍याच्या हातून जावयाचा खून होणार...
कोरसः काय???
(नवरा - मला चालेल)



-------------------------------------समाप्त-------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा

चौकोनी त्रिकोण (भाग २)

ज्योतिष्याचे घर. ज्योतीषी आपल्या खुर्चीवर राजा बसावा तसा ऐटीत बसला आहे. शेजारी एका गादीवर एक म्हातारा माणूस मान खाली घालून काही तरी खरडतोय. राजाराम गणपत आपटे दारात येतात.

आपटे - नमस्कार... मी आत येऊ का?... मी आत येऊ का? (उत्तर येत नाही म्हणून शेवटी आत येतो.) मी आत येऊ का?
म्हातारा - (एखाद्या क्षुद्र कीटकाकडे बघावं तसा बघत) हा प्रश्न बाहेरून विचारायचा असतो.
(आपटे बाहेर जातात. अपमानाने वैतागलेत.)
आपटे - (जरासा चिडून) येऊ का आत आता?
म्हातारा - या...
आपटे - जोशी ज्योतीषी इथेच राहतात का?
म्हातारा - हो... आपल्याला कोण हवंय...
आपटे - ऐश्वर्याला भेटण्यासाठी मी जोशांच्या घरी येईन का?
म्हातारा - नाही...
ज्योतीषी - ओ इकडे या... कोणाला भेटायचंय?
आपटे - मला जोशी ज्योतिष्यांना भेटायचंय...
ज्योतीषी - मीच तो... बोला... मुलीची पत्रिका बनवायची आहे की भविष्य बघायचंय?
आपटे - तुम्हाला कसं कळलं?
ज्योतीषी - रेशनचे तांदूळ घ्यायला कुणी ज्योतिष्याच्या घरी येईन का?
आपटे - ते आहेच... पण मी मुलीसंबंधी कामाने आलोय हे कसं कळलं?
ज्योतीषी - इतकी अजिजी निवडणूकीच्याआधी राजकारण्याच्या आणि उपवर मुलीच्या बापाच्याच चेहर्‍यावर असते. बोला काय काम आहे?
आपटे - मुलीची पत्रिका बनवायची आहे...
ज्योतीषी - उत्तम...
आपटे - तुम्ही दक्षिणा किती घेणार...
ज्योतीषी - मी दक्षिणा घेत नाही...
आपटे - (खूश होऊन) काय???
ज्योतीषी - मी दक्षिणा घेत नाही... मी मानधन घेतो... दक्षिणा किती द्यायची ते यजमान ठरवतो, माझं मानधन मीच ठरवतो...
आपटे - बरं... मानधन किती घेणार?
ज्योतीषी - रुपये १११... (म्हाताऱ्याला खोकल्याची उबळ येते) रुपये ११११ फक्त...
आपटे - बापरे... अहो ५०० त बनवा की...
ज्योतीषी - पैसे वाचवायचे असतील तर बँकेत सेविंग्स अकाउंट उघडा...
आपटे - बरं... हे घ्या आणि बनवा पत्रिका... चांगली बनवा हां...
ज्योतीषी - अहो मी ब्रम्हदेव नाहीये हवं तसं भविष्य लिहायला... जशी असेल तशी येईल पत्रिका...
आपटे - बरं...
ज्योतीषी - मुलीचं नाव?
आपटे - दोन आहेत... पाळण्यातलं सांगू की बोलण्यातलं?
ज्योतीषी - पाळण्यातलं सांगा हो...
आपटे - कालिंदी
ज्योतीषी - आडनाव एकच आहे ना?
आपटे - हो...
ज्योतीषी - मुलीची जन्मतारीख?
आपटे - १२ डिसेंबर
ज्योतीषी - वर्ष?
आपटे - १९८६
ज्योतीषी - जन्मवेळ?
आपटे - सकाळी १० वाजून ३५ मिनिटे
ज्योतीषी - जन्म स्थळ?
आपटे - कॉट नंबर १२, ब्राम्हणसभा दवाखाना, आडव्या रावणाच्या देवळामागे, पुणे ३०.
ज्योतीषी - पत्रिका ह्या पत्त्यावर पाठवायचेय?  
आपटे - नाही...
ज्योतीषी - मग पुणे ४ पुरलं असतं...
(ज्योतीषी थाटात त्याचा लॅपटॉप उघडतो आणि काही तरी करू लागतो. थोडावेळ जातो. आपट्यांची चलबिचल सुरू होते.)
आपटे - अहो... तुम्ही गेम नंतर खेळाल का? आधी पत्रिकेचं बघा ना प्लीज...
ज्योतीषी - (चिडून) मी पत्रिकाच बनवतोय...
आपटे - काँप्यूटरवर???
ज्योतीषी - हो...
आपटे - अहो मला आपली जुन्या पद्धतीची साधीशी पत्रिका द्या की बनवून... कशाला उगाच तुमच्या काँप्यूटरला त्रास?
ज्योतीषी - तशी गुलाबी कागदावरची पन्नास रुपयातली पत्रिका बनवून हवी असेल तर ह्यांना भेटा (म्हातार्‍याकडे बोट दाखवतो)
आपटे - हे कोण?
ज्योतीषी - हे ओरिजिनल जोशी ज्योतीषी...
आपटे - मग तुम्ही कोण???
ज्योतीषी - मी लेटेस्ट जोशी ज्योतीषी... वर्जन २. ०
आपटे - म्हणजे काय?
ज्योतीषी - कळेल...
आपटे - अहो पण तुम्ही इतके लहान दिसता, अनुभव आहे ना?
ज्योतीषी - हा प्रश्न ज्ञानेश्वरांना नाही विचारलात... इतक्या लहानपणी ज्ञानेश्वरी लिहिलीत... अनुभव आहे ना?
आपटे - बरं...
ज्योतीषी - तुमच्या समाधानासाठी म्हणून सांगतो... माझं भविष्य मी जन्माला यायच्या आधीच सांगितलं होतं... आता बोला...
आपटे - पत्रिका बनवताय ना???
ज्योतीषी - हो हो...
(थोड्यावेळाने विजयी मुद्रेने ज्योतीषी लॅपटॉप मधून एक सिडी काढून आपट्यांना देतो.)
ज्योतीषी - ही घ्या पत्रिका...
आपटे - अहो ही बघणार कशी???
ज्योतीषी - काँप्यूटरवर...
आपटे - काँप्यूटर नाहीये घरी...
ज्योतीषी - मग प्रिंट आऊट काढा...
आपटे - अहो प्रिंटर पण नाहीये...
ज्योतीषी - मी देतो ना प्रिंट आऊट काढून
आपटे - थँक्यू हा...
ज्योतीषी - सात रुपये पर पेज...
आपटे - हे घ्या... आता सांगा बघू काय लिहिलंय भविष्यात...
ज्योतीषी - त्याचा चार्ज वेगळा आहे... रुपये ५०० फक्त...
आपटे - अहो आयुष्यभराची बेगमी आजच करणार आहात का तुम्ही...
ज्योतीषी - तुम्हाला कळतं पत्रिकेतलं काही?
आपटे - हे घ्या... बघा पटापट...
(ज्योतीषी पत्रिका पाहू लागतो. हळू हळू त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात. एकदम उठून उभा राहतो)
ज्योतीषी - बापरे...
आपटे - काय झालं हो?
ज्योतीषी - हे... हे... काय बघतोय मी???
आपटे - पत्रिका...
ज्योतीषी - ते माहिती आहे हो... पत्रिकेत काय बघतोय मी असं म्हणायचं होतं मला...
आपटे - बरं बरं
ज्योतीषी - करू सुरुवात पहिल्यापासून???
आपटे - हो...
ज्योतीषी - बापरे... हे काय बघतोय मी???
आपटे - काय झालं गुरुजी???
ज्योतीषी - अहो कोणत्या अवलक्षणी मुलीची पत्रिका आहे ही???
आपटे - तोंड सांभाळून बोला, माझ्या मुलीची आहे...
ज्योतीषी - (जीभ चावतो) अहो तुम्ही इतके वाईट नाही आहात हो... का स्वतःच्या जिवावर उठलायत?
आपटे - अहो नीट सांगाल का मला...
ज्योतीषी - तुम्ही मुलीसाठी स्थळं बघताय ना???
आपटे - हो...
ज्योतीषी - अहो हिच्या नवर्‍याच्या हातून तुमचा खून होणार आहे...
आपटे - काय???
ज्योतीषी - हिच्या पत्रिकेत साफ लिहिलंय... हिच्या नवर्‍याच्या हातून तुमचा खून होणार आहे... म्हणजे तुमचा जावई तुमचा खून करणार...
आपटे - पत्रिका बरोबर बनवली आहे ना?
ज्योतीषी - (ज्योतीषी काँप्यूटरला विचारतो) बरोबर बनवलीस ना रे??? हो म्हणतोय...
आपटे - आता हो काय करायचं???
ज्योतीषी - आता काही नाही करायचं...
आपटे - म्हणजे???
ज्योतीषी - आता मुलीचं लग्न नाही करायचं...
आपटे - अहो असं कसं करून चालेल... मुलीचं लग्न तर करायलाच हवं...
ज्योतीषी - मग अजून एक करता येईल...
आपटे - (उत्साहात) काय??? काय???
ज्योतीषी - चार माणसं जमवायला सुरुवात करता येईल...
आपटे - अहो असं नका म्हणू... हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे...
ज्योतीषी - बरं... तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी जा आणि मुलीशी बोला ह्या विषयावर...
आपटे - चालेल...

(ब्लॅक आऊट)

नवरा मान खाली घालून घरात येतो. खुर्चीवर मान मागे टाकून बसतो. चेहर्‍यावर टेंशन आहे.
बायको - या... आलात का?
नवरा - ह्म्म्म्म
बायको - काय हो, काय झालं? ज्योतिष्याने अपमान केला का?
नवरा - तो ज्योतीषी म्हणजे काय माझी बायको आहे पावलो पावली अपमान करायला?
बायको - मग रस्त्यात पोलिसाने पकडलं का?
नवरा - नाही...
बायको - मग सिगारेटचे भाव पुन्हा वाढले का?
नवरा - अग नाही गं माझे आई
बायको - अहो मग असा सुतक लागल्यासारखा चेहरा करून का बसलात?
नवरा - सुतक लागलं नाहीये पण लागणार आहे लवकरच...
बायको - अहो काय बोलताय? कळेल असं सांगाल का?
नवरा - ज्योतिष्याकडे गेलो होतो ना मी...
बायको - माहिती आहे, पुढे बोला...
नवरा - त्याने पमीची पत्रिका बनवली... त्यात असं लिहिलंय की...
बायको - की पमीच्या पत्रिकेत लग्नाचा योग नाही... हाय रे दैवा तू हे काय केलंस??? माझ्याच पोरीच्या वाट्याला का हे भोग...
नवरा - अगं गप्प बस जरा... पमीच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे...
बायको - नशीब... मला वाटलं आता त्या बिचारीला तुम्हाला आयुष्यभर झेलावं लागतंय की काय...
नवरा - बोलू का मी?
बायको - बोला...
नवरा - पमीच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे...
बायको - अहो पुढे बोला... पटापट बोला आणि... सारखं आपलं रेकॉर्ड अडकल्या सारखं फिरवून फिरवून तेच काय सांगताय...
नवरा - ए गप... जर पमीने लग्न केलं तर तिच्या नवर्‍याच्या हातून माझा खून होणार असं लिहिलंय पत्रिकेत...
बायको - हात्तिच्या इतकंच ना... मला वाटलं काय मोठं संकट आलंय...
नवरा - हे मोठं संकट नाहीये???
बायको - नाहीये...
नवरा - अगं माझा जीव जाणार ह्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं???
बायको - अहो तुमच्या जिवाचं काय घेऊन बसलात. नाही तरी पमीचं लग्न होऊन गेल्यावर तुम्हाला काही उद्योग आहे का?
नवरा - काहीही काय अगं...
बायको - दिवसभर एकटे घरात बिड्या फुंकत बसणार, फुकट्या मित्रांसोबत जय भारत मध्ये चहा ढोसणार, ते मिथूनचे आचरट सिनेमे पाहणार, टवाळ मित्र जमवून पत्ते कुटणार... त्यापेक्षा या इथे... मी तुमच्यासाठी एक फ्रेम घेऊन ठेवली आहे...
नवरा - झालं तुझं? मला माझ्या मरण्याचं जितकं टेंशन नाही तितकं पुन्हा तुला भेटण्याचं आहे...
पण म्हणा मी तुझ्या सारखा इथे लटकणार नाही कारण मला मुक्ती मिळणार आहे...
बायको - ती कशी काय?
नवरा - कारण माझा जीव कशातही अडकला नाहीये... तू मात्र तुझ्या आईने दिलेल्या पायपुसण्यापासून ते पायपुसणी छान वाटावीत अशा तुझ्या साड्यांपर्यंत सगळ्यात अडकून पडलेयस...
बायको - आपण मुद्द्याचं बोलुया का?
नवरा - बरं...
बायको - मी काय म्हणते... अहो तसंही पमी गेल्यावर तुम्ही एकटेच उरणार त्यामुळे जगण्या-मरण्याची काळजी कशाला... आणि जावयाशी कुजकटपणे वागू नका, मग तो कशाला करील तुमचा खून...
नवरा - मी पण बराच विचार केलाय ह्यावर... तसंही पमी गेल्यावर मी एकटाच उरणार त्यामुळे जगण्या-मरण्याची काळजी कशाला... आणि जावयाशी नीट वागलं, मग तो कशाला करील माझा खून...
बायको - ओ विद्वान... हा विचार मीच तुम्हाला ऐकवलाय आत्ता...
नवरा - मी ह्या पुढे विचार केलाय... आपण जगलो ५०-५५ वर्ष... आता आपल्या आयुष्याच्या मोहापायी मुलीचं आयुष्याची का वाट लावायची. करतो तिचं लग्न... जगू दे तिला तरी सुखाने...
बायको - आता कसं बोललात???
नवरा - मुलीच्या सुखासाठी हा बाप स्वतःच्या आयुष्याची आहुती द्यायला तयार आहे...
बायको - टाळ्या... टाळ्या... टाळ्या... बरं आता पमी यायची वेळ झाली... चेहरा हसरा ठेवा जरा...
नवरा - हो हो...

पमी - डॅडी... मी आले...

नवरा - ये ये ये बेटा कशी आहेस?
बायको - अरे अरे हे काय केसांचं टोपलं करून ठेवलंय??? अहो तिला वेणी घालायला सांगा बघू...
पमी - डॅडी... तुम्ही म्हणत होतात ना की आता माझं लग्नाचं वय झालंय... माझ्यासाठी तुम्ही स्थळं शोधायला सुरुवात करणार आहात...
नवरा - हो...
पमी - मी तुमचे कष्ट वाचवले...
नवरा - म्हणजे???
पमी - मी माझ्यासाठी मुलगा शोधलाय...
बायको - काय??? कार्टे लाज नाही वाटत बापाला सांगायला...

नवरा - काय?
बायको - अहो तिला विचारा कोण आहे तो ज्याने माझ्या भोळ्या भाबड्या मुलीला फूस लावली... विचारा विचारा...
नवरा - कोण आहे तो? काय करतो? कुठे राहतो? कुठली सिगारेट ओढतो?
पमी - सांगते सांगते...
बायको - कोण उपटसुंभ पकडलाय काय माहिती...
नवरा - घरची परिस्थिती कशी आहे...
पमी - उत्तम...
नवरा - नाव काय?
पमी – गिरिष जोशी...
नवरा - कुठे राहतो...
पमी - पुण्यातच...
नवरा - पुण्यात कुठे राहतो... घरात असं उत्तर दिलंस तर थोतरवीन...
पमी - नळ स्टॉप जवळ... स्वतःचा व्यवसाय आहे...
बायको - अहो तिला विचारा घरी कोण कोण असतं?
नवरा - घरी कोण कोण असतं?
पमी - तो आणि त्याचे बाबा...
नवरा - भाऊ बहीण?
पमी - एकुलता एक आहे...
नवरा - बरं... मग आता काय करायचंय?
पमी - काय करायचं म्हणजे लग्न करायचं...
नवरा - कुणाशी???
पमी - अहो ह्याच्याशी...
बायको - कार्टीने परस्पर लग्न करायचंही ठरवून टाकलंय... तिला विचारा हॉल पण बुक केलाय का...
पमी - मला असं वाटतं की तुम्ही त्याला एकदा भेटावं...
नवरा - अर्थातच भेटणार... पूर्वी नवरा बायको एकमेकांना डायरेक्ट हार घालतानाच बघत आता मी माझ्या जावयाला मुलीला हार घालतानाच बघू की काय?
पमी - नाही हो... तुम्ही कधी फ्री असाल ते सांगा मी त्याला घरी घेऊन येते...
बायको - हे दिवसभर फ्रीच असतात... कधीही आण... आजच आण...
नवरा - उद्या सांग त्याला यायला...आधी एकट्यानेच ये म्हणावं... मुलगा आवडला तर बाबांशी बोलीन मी..
पमी - बरं सांगते...

(मुलगी मोबाईलवरून फोन लावते. हॅलो म्हणते. ब्लॅक आऊट.)

क्रमशः
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा.

चौकोनी त्रिकोण (एकांकिका) भाग १

सूचना - हे नाटक, त्यातील पात्र आणि घटना पूर्णपणे लेखकाच्या मनाचे श्लोक आहेत. ह्यातील पात्रांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती कुठेही आढळल्यास तो योगायोग समजावा आणि त्यांच्यापासून कटाक्षाने दूर रहावे.

पात्र - नवरा, फोटोतून बोलणारी स्वर्गवासी बायको, मुलगी, ज्योतीशी पिता पुत्र.

----------------------------------------------------------------------------------------------


               मी वैकुंठवासी राजाराम गणपत आपटे ह्यांची कैलासवासी पत्नी जगदंबा राजाराम आपटे. म्हणजे, आमचे हे अजून जिवंत आहेत, पण आमच्या बंगल्याचं नाव वैकुंठ असल्याने मी त्यांना प्रेमाने वैकुंठवासी म्हणते. आमचं लग्न चारचौघांसारखं बघण्याचा कार्यक्रम करून, पत्रिका जुळवून झालं. ह्यांचं घराणं पहिल्यापासून श्रीमंत. घरी गडगंज संपत्ती पण मुलगा एकच. लग्न मोठ्या धूमधडाक्यात झालं. गावजेवण घातलं होतं त्या दिवशी. एकुलते एक असल्याने हे अतिशय लाडावलेले होते. खरं सांगायचं तर आमचे हे म्हणजे लग्नाआधी एकदम बावळट्ट ध्यान होते. कसली म्हणून काळजी घ्यायची नाही, जरा म्हणून चटपटीतपणा नाही. पूर्वी आई जशी कामं करायची तशी आता बायको करणार ह्या भ्रामक समजुतीत हे सुरुवातीचे काही दिवस होते. पण हळू हळू मी त्यांना सुधरवायला सुरुवात केली. काही वर्षातच सुतासारखे सरळ झाले असते, पण दुर्दैवाने पहिल्याच बाळंतपणात मला देवाज्ञा झाली... आणि... ह्यांनी सोडलेली सिगारेट पुन्हा सुरू केली.
मुलीला सांभाळताना ह्यांची होणारी कसरत मी फोटोतून बघत होते. कार्टी पण इतकी वाह्यात की बापाला सळो की पळो करून सोडायची. पण एक मात्र आहे की ह्यांनी माझ्यानंतर दुसरं लग्न केलं नाही.
अरे अरे अरे अरे... काय पसारा करून ठेवलाय सगळीकडे..., आज चांगलंच फैलावर घेणार आहे ह्यांना.

(बापाची एंट्री होते. )

बायको-  या... झालं का गाव उंडारून?
नवरा-    घ्या, झाली कटकट सुरू... अगं तू आता आमच्यात नाहियेस बये... आता तरी त्रास देणं सोड मला...
बायको-  अहो... हा काय घराचा उकिरडा करून ठेवलाय???
नवरा-   गडी रजेवर आहे माहिती आहे ना तुला?
बायको- तुम्हाला हात दिलेत ना दैवाने? पत्ते कुटण्याशिवाय हातांनी अजूनही कामं करता येतात... मी होते तेव्हा कशी     हो सगळी कामं करायचात गुपचुप?
नवरा- बाहेर गाड्यांचे भोंगे आणि आत हा भोंगा. कानाची भोकं होणारेत माझ्या...
बायको- तुमच्या कानाची तशीही भोकंच आहेत... तुम्हाला हजार वेळा सांगितलं आहे की बाहेर पडताना सगळे दिवे       मालवू नका म्हणून, मला अंधारात एकटीला भीती वाटते.
नवरा- पहिली गोष्ट म्हणजे तुला... चक्क तुला एखाद्या गोष्टीची भीती वाटते ह्यावर माझा विश्वास नाही. तू घाबरणं म्हणजे जास्वंदाच्या फुलाला वास येणं, दाउदने सत्यनारायण घालणं आणि राजकारण्यांनी आश्वासनं पाळण्याइतकी अशक्य गोष्ट आहे. दुसरं म्हणजे विजेचं बिल माझं सासरा भरत नाही.
बायको- बाबांवर जायची काहीही गरज नाहीये. इतकी सुंदर, सुशील बायको मिळाली तुम्हाला... जरा म्हणून कौतुक नाही बायकोचं...
नवरा- कौतुक नाही?
बायको- हो नाही
नवरा- काय कमी करतो गं तुझं मी?
बायको- आधी माझं काय करता ते सांगा, कमी जास्त नंतर बघू
नवरा - रोज तुझा फोटो स्वच्छ करतो
बायको- गडी करतो
नवरा- रोज फोटोला हार घालतो
बायको- गडी घालतो
नवरा- दर सहा महिन्यांनी तुझ्या फोटोची फ्रेम बदलतो... लग्नाआधी साड्यांनी वीट आणला, आता फ्रेम मुळे वैताग येतोय. काठावरती मोराचं डिझाइन असलेली फ्रेम मिळत नाही गं जगात कुठेही...

बायको- फोटो फ्रेम पण गडीच बदलतो. काय ते मेलं कळकट दुकान... एकदा तर मेल्याने माझ्या फ्रेम मध्ये दुसर्‍याच कुणाच्या बायकोचा फोटो घालून तुम्हाला दिला
नवरा- हो ना
बायको- आणि तुम्हीही तो सरळ अडकवलात भिंतीवर, जरा म्हणून लाज नाही...
नवरा- अगं आधी माझ्या लक्षातच आलं नाही...
बायको- हेच तुमचं लक्ष बायकोकडे...
नवरा- पण ३-४ दिवस घर बरंच शांत-शांत वाटल्यावर लक्षात आलं... पण फोटोतली बाई दिसायला बर्‍यापैकी होती म्हणून ठेवला फोटो... तू काय, माझ्या मनात आहेसच गं...
बायको- २ दिवस त्या घाणेरड्या फडताळात पडून राहावं लागलं होतं... कसला तो मेला कुबट्ट वास. आणि मेल्याने बिपाशा बासू, सच्छींद्र महाराज आणि मी असं तिघांना एकावर एक ठेवलं होतं...
नवरा- हा हा हा हा.... बिचारे सच्छींद्र महाराज
बायको- अहो... एक गोष्ट बरेच दिवस मनात होती, विचारू का?
नवरा- माझी परवानगी मागतेयस? लग्नानंतर माझी सिगरेटची पाकिटं चुलीत टाकताना मागितली होतीस परवानगी? आईच्या साड्या परस्पर बोहारणीला देताना मागितली होतीस परवानगी? माझ्या सगळ्या दारूच्या बाटल्यांमध्ये चहाचं पाणी भरून ठेवताना मागितली होतीस परवानगी?
बायको- तेव्हाची गोष्ट वेगळी होती...
नवरा- काय वेगळी होती???
बायको- अहो तेव्हा मी जिवंत होते, माझं तुमच्यावाचून काही अडत नव्हतं... आता मेलं साधं फोटो पुसायचा म्हटलं तरी स्वत:चं स्वतः करता येत नाही... बरं ऐका...
नवरा- ऐकवा...
बायको- मी गेल्यावर तुम्ही दुसरं लग्न का नाही केलंत हो? खरं खरं सांगा हां... मनातलं अजिबात राखून ठेवू नका...
नवरा- खरं सांगू...
बायको- हो...
नवरा- आपलं लग्न झालं, सुरुवातीचे काही दिवस फार मजेत गेले... पण नंतर...
बायको- नंतर काय?
नवरा- नंतर... नंतर तुझ्या बापसाला तुझं लग्न उरकून टाकायची घाई का झाली होती ते मला कळलं...
बायको- काय?????????
नवरा- लग्नाच्यावेळी माझ्याकडे बघून जे डेंजर हसलाय तो, तेव्हाच मनात शंका आली होती... तुला माझ्या हवाली करून त्याने स्वत:ची सुटका करून घेतली...
बायको- तोंडाला येईल ते बोलू नका... पाठवणीच्या वेळी बाबा मला मिठी मारून किती रडले... पाहिलं नाहीत का?
नवरा- पाहिलं ना... नंतर त्यांनी मलाही मिठी मारली... आणि रडत रडत माझ्या कानात काय म्हणाले माहिती आहे?
बायको- काय?
नवरा- खो...
बायको- काय?
नवरा- अग खो... म्हणजे खो दिला त्यांनी मला. म्हणाले आता रडण्याची तुझी पाळी...
बायको- काहीही फेकू नका...
नवरा- विश्वास नसेल बसत तर विचार बापालाच तुझ्या...
बायको- बाबा असं म्हणणं शक्यच नाही...
नवरा- जाऊ दे झालं ते झालं... तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू माझा ४ वर्ष जो अनन्वित छळ केलास त्याला घाबरून मी दुसरं लग्न केलं नाही...
बायको- मी काय छळ केला हो तुमचा... सासू बाईंनीच लाडावून ठेवलं होतं तुम्हाला... माझा बाब्या माझा बाब्या करून डोक्यावर चढवून ठेवलं होतं...
नवरा- साफ खोटं आहे हे...
बायको- लग्नापूर्वी तुम्हाला साधा चहा तरी करता येत होता का?
नवरा- आपल्या घरात फार पूर्वी पासून गडी माणसं आहेत, मला काय गरज काही शिकायची???
बायको- ते काही असो, माणसाला यायलाच हवं. मी तुम्हाला स्वावलंबी बनवलं... एक कप चहा करायला किती कप पाणी ठेवायचं हे ही माहिती नव्हतं. उण्यापुर्‍या २ वर्षात तुम्हाला स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी ह्यात तरबेज केलं मी त्याबद्दल आभार मानायचे सोडून मलाच नावं ठेवताय... काय मेली पुरुषाची जात...
नवरा- तुझ्या बापानी पुढाकार घेऊन आपलं लग्न ठरवलं म्हणून मी कायम त्यांचा राग केला, पण एका गोष्टीसाठी मात्र मी त्यांना पूर्ण मार्क देतो...
बायको- कोणती हो?
नवरा- तुझं नाव कसलं फर्स्टक्लास ठेवलंय... जगदंबा... अगदी शोभून दिसतं हो तुला... एक गंमत माहिती आहे का तुला?
बायको- काय?
नवरा- जगातली तू एकमेव व्यक्ती आहेस जी "मी माझ्या नावाला जागले" असा दावा करू शकते...
बायको- हे अती होतंय... तुम्हाला एकदा चांगली अद्दल घडवणार आहे... एकदा मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली की आहातच तुम्ही आणि तुमचा समाचार घ्यायला मी...
नवरा- बापरे, हे लक्षातच आलं नाही माझ्या...
बायको- माहिती होतं तुमच्या लक्षात येणार नाही ते, उगाच नाही तुम्हाला ध्यान म्हणत मी... तुमचं सोडा आता, पमी कुठाय हो???
नवरा- कुठे तरी बाहेर गेलेय, येईलच इतक्यात...
बायको- कुठे गेली आहे ती?
नवरा- ती सांगून जाते का? कार्टी पार हाताबाहेर गेली आहे... जरा म्हणून बापाला धूप घालत नाही. आईचा नेमका तो एक गुण उचललाय...
बायको- माझ्यावर कसची जातेय, लहानपणापासून तुम्हीच वाढवलंय ना तिला...
नवरा- पण नऊ महिने तुझ्या पोटातून बापावर चाललेले अत्याचार ऐकत होती ना ती...
बायको- तुमची वायफळ बडबड झाली असेल तर आता आपण आपल्या मुलीविषयी बोलूया का?
नवरा- हो हो
बायको- मी काय म्हणते... बास झालं आता... पोरगी घोडनवरी व्हायच्या आत तिचं लग्न उरकून टाका...
नवरा- हो गं. किती वेळा सांगितलं तिला, पण ऐकेल तर शपथ...
बायको- अहो तेविसावं लागेल यंदा तिला... मी तिच्या वयाची असताना मला ती झाली होती...

(बाहेरून जोरात हाक ऐकू येते)

डॅडी........

(मुलगी बॅग नाचवत आत येते)

पमी - हाय डॅड
नवरा- बाबा बोल...
पमी - हाय बाबा...
नवरा- कार्टे थोडी सुधार, जरा मुली सारखी वाग आता. बापाला नमस्कार करायचा सोडून हाय करतेस? तुझ्या अशा वागण्याने एक दिवस मीच हाय खाईन...
पमी - काही तरी बोलू नका हो बाबा... अजून थोडी वर्ष थांबा...
नवरा- असं म्हणतेस???? बरं थांबतो बुवा, मला तरी दुसरं काय काम आहे... नाहीतरी वर जाऊन पुन्हा तुझ्या आईच्या तावडीत सापडण्यापेक्षा हे बरंच बरं आहे...
बायको- काय गं घोडे, ह्या काय झिंज्या वाढवून ठेवल्यास?
नवरा- अगं तुझा आवाज तिला ऐकू येत नाही... ती शिक्षा मला एकट्यालाच आहे...
बायको- अहो... बघताय काय शुंभा सारखे... तेल लावून चांगली चापून चोपून वेणी घाला बघू तिची...
नवरा- असू दे गं...
पमी - कुणाशी बोलताय बाबा???
नवरा- स्वतःशीच बोलतोय गं... (फोटोकडे हात दाखवून) माणसाला वात झाला की होतं असं कधी कधी... तू कुठे गेली होतीस?
पमी -आपली कुंदा आहे ना...
नवरा- कोण कुंदा
बायको- अहो भिड्यांची मुलगी, अगदीच कसे हो वेंधळे तुम्ही... काही म्हणून काही लक्षात राहत नाही...
नवरा- हांहां... आठवलं आठवलं... तिची आई मिसेस कर्वे नगर स्पर्धेत पहिली आली होती तीच काही भिडे?
बायको- हे बरोबर लक्षात राहिलं तुमच्या...
पमी - यस्स... तीच ती कुंदा भिडे...
नवरा- काय झालं तिला?
पमी - तिला कुठे काय झालंय?
नवरा- अगं मग तिचं नाव का घेतलंस?
पमी - सांगते... तर मी आणि कुंदा आज तिच्यासाठी खरेदी करायला गेलो होतो तुळशी बागेत...
नवरा- बापरे...
पमी - बापरे काय त्याच्यात?
नवरा- अगं तुळशी बाग नावाचा तो एक असा चक्रव्यूह आहे की जिथे गेलेला माणूस परत कधी बाहेरच येत नाही...
पमी - काहीही काय हो...
नवरा- अगं हो... कित्येक नवर्‍यांच्या बायका पिशवी घेऊन आत शिरतात त्या आठवडेच्या आठवडे परतच येत नाहीत...
पमी - तुमचं आपलं अतीच असतं... हां थोडी गर्दी असते तिथे, पण ठीक आहे...
नवरा- बरं झालं तू आपली निघून आलीस ते...
पमी - तुम्ही काय केलंत बाबा सकाळ पासून? म्हणजे मॉर्निंग वॉक, त्या नंतर जय भारत मधला चहा प्लस कालचा पेपर (बायको: प्लस ह्यांची धुरांडी) वाचून घरी आल्यावर काय केलंत?


नवरा- आम्ही असा विचार करत होतो की...
पमी - आम्ही कोण?
नवरा- आम्ही म्हणजे मीच गं... आदरार्थी एकवचन म्हणतात त्याला. बरं, विषयांतर नको... तर, मी असा विचार करत होतो की...
पमी - की मी आता २ महिन्यात तेवीस वर्षाची होईन, माझं लग्नाचं वय उलटून चाललंय, आई माझ्या एव्हढी असताना तिला मी झाले होते त्यामुळे आता माझं लवकरात लवकर लग्न करायला हवं...
नवरा- बरोब्बर. मग कधी करायची सुरुवात मुलं बघायला?
पमी - करू हो बाबा, कसली घाई आहे?
बायको- त्या घोडीला म्हणावं तिला नसली तरी आम्हाला घाई आहे...
पमी - (आईच्या फोटोकडे बघत) आज आई असती तर तिने अजून ४-५ वर्ष तरी मला लग्न होऊन जाऊ दिलं नसतं...
बायको- मुस्काट फोडीन... शी: ह्या फोटो फ्रेम मध्ये गेल्यापासून मेलं काही म्हणजे काही करता येत नाही मला... अहो, धपाटा घाला बघू तिला एक.
नवरा- म्हणजे तशी तू मला जड झाली नाहियेस... पण तुझं लग्नाचं वय झालंय बाळा. आता उगाच थांबण्यात काय अर्थ आहे...
बायको- अहो असे मुळमुळीतपणे बोलू नका. चांगलं खडसावून सांगा... ३ महिन्यात लग्न आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
नवरा- ३ महिन्यात लग्न आणि १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी+ बायको - काय???
नवरा- ३ महिन्यात लग्न आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी - बाबा मला एक सांगा, तुम्ही लग्न केलं?
नवरा- हो केलं...
पमी - तुम्हाला लग्न करून काय मिळालं?
नवरा- काय मिळणार?
पमी - शाळेतल्या बाईंसारखी वागणारी एक बायको आणि माझ्यासारखी एक भन्नाट मुलगी...
नवरा - ह्म्म्म्म्म...
पमी - मी ही ह्याच सगळ्यातून जावं असं खरंच तुम्हाला वाटतं का?
नवरा- नाही...
पमी - नाही ना? मग का माझ्या लग्नाच्या मागे लागले आहात???
नवरा- कारण अशी बायको मिळायला तू मुलगा नाहियेस आणि मुलीचं लग्न २४ वर्षाच्या आत झालंच पाहिजे अशी आपल्या घराण्याची रीत आहे...
पमी - बाबा मी आयुष्यभर लग्न न करता रहायचं ठरवलंय...
नवरा- कार्टे... काहीही काय बोलतेस???
बायको- अहो कानाखाली वाजवा तिच्या आत्ताच्या आत्ता...
पमी - गंमत करतेय हो... द्या टाळी...
नवरा- अगं तुझ्या जिभेला काही हाड??? प्रत्यक्ष बापाची चेष्टा करतेस???
पमी - चेष्टा नाही हो बाबा, थोडी गंमत...
नवरा- तुझी गंमत जंमत झाली असेल तर आपण विषयाकडे वळूया का?
पमी - बोला...
नवरा- बोला काय? मी सत्यनारायणाची पूजा सांगतोय का? नीट लक्ष देऊन ऐक, येत्या तीन महिन्यात काहीही करून तुझं लग्न झालंच पाहिजे...
बायको- आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी - पण बाबा...
नवरा- पण बीण काही नाही...
पमी - ऐका तर माझं... अहो अजून मला किती तरी गोष्टी करायच्यात, कुठे कुठे फिरायचंय, बरंच काही काही बघायचंय...
नवरा- बघायचंय ना? मग मुलं बघ... वाटल्यास बरीच बघ... पण उद्यापासून तुझ्यासाठी वरसंशोधन सुरू
बायको- शाब्बास रे नवरया...इतक्या वर्षात पहिल्यांदाच माझ्या नवर्‍याला शोभेलंसं बोललास...
नवरा- गप्प बस माझे आई...
बायको- आता तुम्ही खुशाल माझ्या बाजूला लटका, मला जराही अपमान वाटणार नाही...
नवरा- मी उद्यापासूनच सुरुवात करतो... उद्याच गुरुजींकडे जाऊन पत्रिका टाकून येतो...
बायको- ऍहॅरे... आले मोठे पत्रिका टाकणारे... पत्रिका बनवली आहे का आधी... कानी कपाळी ओरडून सांगत होते तेव्हा ऐकलं नाही...
नवरा- अरे हो... पण आपण तुझी पत्रिकाच बनवली नाहीये... ठरलं तर, उद्या पत्रिका बनवण्यापासूनच सुरुवात करावी...
पमी - डॅड...
नवरा- काय गं?
पमी - बेस्ट ऑफ लक

(बाप कपाळावर हात मारून घेतो. ब्लॅक आऊट)

क्रमशः
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा.